मुक्तपीठ टीम
एलॉन मस्क हे ट्विटरचे मालक झाल्यापासून कंपनीमध्ये अनेक धक्कादायक प्रकार घडत आहेत. गुरुवारच्या बैठकीत एलॉन मस्क बोलत असतानाच कर्मचारी बैठक सोडून घरी गेले. आता तर ट्विटर बंद होणार असल्याची बातमी समोर आली आहे. ट्विटर युजर्स ट्विटरवरच #RIPTwitter आणि #GoodByeTwitter सह ट्विट करत आहेत. या दोन हॅशटॅगसह आतापर्यंत हजारो ट्विट करण्यात आले आहेत. त्यातच आता एलॉन मस्क यांनी असं एक ट्विट केलंय की जे पाहून आता ट्विटर बंद होणार की काय? अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.
खरं तर, आज सकाळपासून ट्विटर बंद होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या, त्यानंतर युजर्स अशा हॅशटॅगसह ट्विट करत आहेत. ट्विटर बंद झाल्याच्या अफवांदरम्यान, अनेक यूजर्सनी आर्काइव ट्वीटची मागणी केली आहे जेणेकरून ते त्यांचे ट्विट आणि खाती सेव्ह करू शकतील. तुम्हाला ट्विटरवरील एखाद्या गोष्टीची काळजी असल्यास, आता डिजिटल आर्काइववर तात्पुरते तज्ज्ञ बनण्याची वेळ आली आहे,” असे कॅरोलिन सिंडर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधक आणि अमेरिकेच्या माहिती आयुक्त कार्यालयातील सहकारी कॅरोलिन सिंडर्स यांनी सांगितले.
ट्विटरच्या शेकडो कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडली!!
- एलॉन मस्क यांनी यासंपूर्ण घटनेवर भाष्य केले आहे की, सोशल मीडिया कंपनीच्या भवितव्याबद्दल त्यांना फारशी चिंता नाही कारण कंपनीसोबत सर्वोत्तम लोक जोडलेले आहेत.
- मस्क यांनी कर्मचाऱ्यांना ट्विटर सोडायचे की कंपनीसोबत राहायचे हे ठरवण्यासाठी गुरुवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत वेळ दिला होता.
- या मुदतीनंतर शेकडो कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडली आहे.
- पुढील काही दिवस कार्यालयीन इमारती बंद ठेवत असल्याचा संदेश ट्विटरने कर्मचाऱ्यांना पाठवला होता.
- यानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडली होती.