Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सोलापूरमधील गावाचं नाव राहुल नगर का झालं?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
MumbaiTerrorAttack

मुक्तपीठ टीम

२६ नोव्हेंबरचा दिवस मुंबईकर आणि संपूर्ण देशासाठी काळा दिवस आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला आज १४ वर्षे पूर्ण झालेत. मुंबई हल्ल्याने संपूर्ण जग हादरलं होतं. दहशतवाद्यांनी मुंबईची शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताज हॉटेलसह सहा ठिकाणी हल्ला केला होता, ज्यात १६०हून अधिक निरपराधांचे प्राण गेले होते. या हल्ल्यात पोलिसांनीही आपले प्राण गमावले. आपल्या गावाचं नामकरण राहुल नगर असं करून या हल्ल्यात शहीद झालेले हवालदार राहुल शिंदे यांना त्यांच्या गावतल्या लोकांनी एक अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे.

२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले राहुल शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या गावातील लोकांनी गावाचे नाव बदलले आहे. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील सुलतानपूर गाव आता राहुल नगर म्हणून ओळखले जाणार आहे. राहुल हे महाराष्ट्राच्या राज्य राखीव पोलीस दलात (SRPF) हवालदार होते.

कोण होते राहुल शिंदे?

  • राहुल शिंदे हे सोलापूर जिल्ह्यातील सुलतानपूर गावाचे, सुपुत्र होते.
  • राहुल शिंदे हे महाराष्ट्राच्या पोलीस दलात हवालदार होते.
  • मुंबईच्या २६/११ दहशतवादी हल्ल्याच्या प्रतिकारात त्यांचे मोलाचे योगदान होते.
  • ताज हॉटेलला दहशतवाद्यांपासून मुक्त करण्यासाठी प्रवेश करणारे ते पहिले पोलीस हवालदार होते.
  • हॉटेलमध्ये प्रवेश करताच त्यांची दहशतवाद्यांशी चकमक झाली.
  • त्यांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला.
  • राहुल यांना त्यांच्या सर्वोच्च बलिदानासाठी राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले.

राहुल शिंदेंच्या स्मरणार्थ त्यांच्या गावात स्मारक…

  • मुंबई महापालिकेकडून मिळालेल्या १० लाखांच्या निधीतून राहुल यांचे स्मारक उभारण्यात आले आहे.
  • आज हल्ल्याच्या १४ व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला, त्यांच्या गावाचे नाव बदलून राहुल नगर असे करण्यात येणार आहे.
  • यासाठी सर्व औपचारिकता पूर्ण करण्यात आली आहे.
  • त्यांच्या बलिदानाला सन्मान देण्यासाठी हे मोठे पाऊल आहे.
  • या निर्णयामुळे संपूर्ण गाव आनंदी आहे.

२६/११ मुंबई दहशतवादी हल्ला

  • २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता.
  • २००८ मध्ये पाकिस्तानमधून दहा दहशतवादी समुद्राच्या मार्गे मुंबईत घुसले होते.
  • मुंबईच्या ताज हॉटेलसह सहा ठिकाणी हल्ला करण्यात आला होता.
  • या हल्ल्यात भारतीयांसह अनेक परदेशी नागरिकांचाही मृत्यू झाला होता.
  • लष्कर ए तोयबाच्या या अतिरेक्यांनी हा हल्ला केला होता.
  • या हल्ल्यात १६० हून अधिक निरपराधांचे प्राण गेले होते.
  • आज या हल्ल्याला १४ वर्षे पूर्ण झाले .

Tags: २६/११ (२००८) दहशतवादी हल्ला26/11 Mumbai terror attackMaharashtraMumbai terror AttackRahul NagarRahul Shindesolapur
Previous Post

हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये २९० जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी

Next Post

ऋषभ शेट्टीचा ‘कंतारा’ OTTवरही सुपर हिट! आता हिंदीची प्रतिक्षा…

Next Post
kantara

ऋषभ शेट्टीचा 'कंतारा' OTTवरही सुपर हिट! आता हिंदीची प्रतिक्षा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!