Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिक्षक दिन ५ सप्टेंबरलाच का? समजून घ्या नेमका इतिहास…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
sarvpalli radahakrishnan

मुक्तपीठ टीम

दरवर्षी भारतात ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस आपले माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचाही आहे. यामुळेच दरवर्षी हा दिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरी केला जातो. प्रत्येकाच्या जीवनात शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्वाची आणि विशेष असते. मुलाला यशस्वी आणि उत्तम व्यक्ती बनवण्यासाठी शिक्षक खूप महत्वाची भूमिका बजावतो. या दिवशी शाळेत आणि महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. विद्यार्थी आपापल्या परीने शिक्षकांबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त करतात. शिक्षक दिनाचा इतिहास काय आहे आणि तो भारतात कधीपासून साजरा केला जातो हे जाणून घेऊया.

 

शिक्षक दिन का साजरा केला जातो?

  • माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस (५ सप्टेंबर) दरवर्षी भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
  • डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन हे शिक्षक होते तसेच स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते.
  • त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांकडे त्यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी आपल्या आयुष्यातील चाळीस वर्षे शिक्षक म्हणून भारताचे भविष्य सुधारण्यात घालवले.
  • सर्वपल्ली राधाकृष्णन यांना २७ वेळा नोबेल पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले.
  • १९५४ मध्ये त्यांना भारतरत्न प्रदान करण्यात आले.
  • देशभरात शिक्षक दिन साजरा करण्याची परंपरा १९६२ साली सुरू झाली.
  • डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांच्या विद्यार्थ्यांनी यासाठी त्यांची मान्यता घेतली होती.
  • तेव्हा डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणाले होते की माझा वाढदिवस साजरा करण्याऐवजी हा दिवस शिक्षकांच्या सन्मानार्थ साजरा करावा.
  • मग त्यांनी स्वतः शिक्षकांच्या सन्मानार्थ या दिवशी शिक्षक दिन साजरा करण्याची सूचना केली.
  • डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणायचे की संपूर्ण जग एक शाळा आहे, जिथे आपण काही ना काही शिकत राहतो.

 

कोण होते डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन?

  • डॉ राधाकृष्णन यांचा जन्म १८८८ साली तामिळनाडूच्या तिरुत्तानी नावाच्या गावात झाला.
  • डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले.
  • कृष्णन लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होते. गरिबीतही ते अभ्यासात मागे राहिले नाहीत आणि फिलॉसोफीमध्ये एमए केले.
  • त्यानंतर १९१६ मध्ये त्यांनी मद्रास रेसिडेन्सी कॉलेजमध्ये फिलॉसोफीचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले.
  • त्यानंतर काही वर्षांनी प्राध्यापक झाले.
  • देशातील अनेक विद्यापीठांमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना घडवण्यात सहभाग घेतला.
  • कोलंबो आणि लंडन विद्यापीठानेही डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांना मानक पदवी देऊन सन्मानित केले.
  • ते १९४९-१९५२ पर्यंत मॉस्कोमध्ये भारताचे राजदूत होते आणि १९५२ मध्ये त्यांची भारताचे पहिले उपराष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रपतीपदही भुषवले.
  • नंतर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

शिक्षक दिनाचे महत्त्वच वेगळे…

  • शिक्षक दिनी विद्यार्थी आपल्या शिक्षकाचा सन्मान करण्यासाठी उत्सुक असतात.
  • हा दिवस विद्यार्थ्यांसाठी खास आहे.
  • विद्यार्थी शिक्षकांनी त्यांचे भविष्य घडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी त्यांचे आभार मानतात.
  • शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी शिक्षकांना भेटवस्तू देतात आणि त्यांच्यासाठी विशेष सन्मान समारंभ आयोजित करतात.

Tags: Indiateachers dayडॉ सर्वपल्ली राधाकृष्णनभारतशिक्षक दिन
Previous Post

“मी कोनाचा गुरू नाही, माह्या कोनी चेला नाही” असे म्हणणारे संत गाडगे महाराज मला जवळचे…पण शिकवणारे अनेक!

Next Post

“गृहखात्यामुळे राष्ट्रवादीच्या लोकांकडे शिवीगाळ, ॲट्रोसिटीच्या धमक्या, महिलांना मारहाण याचं लायसन्स आहे का?”

Next Post
chitra wagh & ncp

“गृहखात्यामुळे राष्ट्रवादीच्या लोकांकडे शिवीगाळ, ॲट्रोसिटीच्या धमक्या, महिलांना मारहाण याचं लायसन्स आहे का?”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!