मुक्तपीठ टीम
भाजपा खासदार तापीर गाव यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना स्पायडरमॅन असे म्हटले आहे. कारण कोळी जसे जाळे विणतो तसे गडकरी यांच्या कार्यकाळात देशभरात रस्त्यांचे जाळे विणले आहे. तसेच रस्तेबांधणीसाठी त्यांनी सरकारचे कौतुकही केले. रस्ते सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्याची आणि अपघातांना आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी काँग्रेस आणि इतर काही विरोधी पक्षांनी लोकसभेत केली. त्याचवेळी तापीर गाव यांनी हे वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले तापीर गाव?
- भाजपाचे तापीर गाव म्हणाले की, मी नितीन गडकरींना ‘स्पायडरमॅन’ असे नाव दिले आहे, कारण कोळी जाळे घालतो तसे त्यांनी रस्त्यांचे जाळे विणले आहे.
- मोदी सरकार आल्यानंतर चीनच्या सीमेजवळ रस्ते बांधणीचे काम वेगाने सुरू आहे.
- आपल्या राज्यातील अनेक रस्त्यांच्या बांधकामाचा संदर्भ देत अरुणाचल प्रदेशचे लोकसभा सदस्य म्हणाले, “मोदी है तो मुमकीन है, गडकरी है तो मुमकीन है.
- मला आशा आहे की स्पायडरमॅन तो ज्या गतीने रस्ते बांधत आहे त्या गतीने पुढे जात राहाव.
- देश आणि ईशान्य असेच पुढे जात राहतील.
- लोकसभेत बुधवारी ‘२०२२-२३ या वर्षासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या नियंत्रणाखालील अनुदानाच्या मागण्या’ या विषयावर चर्चा सुरू झाली.वायएसआर काँग्रेस पक्षाचे एम भरत म्हणाले की, आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा अमरावती आणि हैदराबादमधील रस्ते संपर्क वाढवण्यावर भर देतो. अशा परिस्थितीत यात काय प्रगती झाली, हे सरकारने सांगावे.
आज भारत रस्त्यांच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर
- काँग्रेसचे एमके विष्णू प्रसाद म्हणाले की, रस्ते बांधणीत पूर्वीच्या काँग्रेस सरकारांनी केलेल्या कामामुळे आज भारत रस्त्यांच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
- ते म्हणाले की, रस्त्यांच्या गुणवत्तेत जर्मनी पहिल्या क्रमांकावर आहे, मात्र भारत ४४ व्या क्रमांकावर आहे.
सरकार रस्त्यांच्या दर्जाकडे पूर्ण लक्ष देत नाही. - प्रसाद म्हणाले, “रस्ता सुरक्षेसाठी वाटप केलेल्या बजेटपैकी फक्त दोन टक्के खर्च केला जातो, तर अमेरिकेत बजेटच्या सहा टक्के खर्च केला जातो.”