Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिवजयंतीला महाराजांना अभिवादन: सुधीर मुनगंटीवार बोलले आणि अजित पवार-सुनील प्रभूंनी काय सुनावले?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Shivjayanti

मुक्तपीठ टीम

शिवजयंती तिथीनुसार साजरी करताना छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्याचा मुद्दा विधानसभेत गाजला. भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई विमानतळाबाहेर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्याचं सांगत विधानभवनात मात्र शासनाच्या वतीने अभिवादनाची सोय केली नसल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. त्यांच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खमकेपणानं उत्तर दिलं. तर शिवसेनेचे पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांनीही सुधीरभाऊंना अभिवादन करायचं असेल तर प्रांगणातील महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं तसं करता आलं असतं, असं सुनावलं.

सुधीरभाऊ मुनगंटीवारांचा काय आक्षेप?

  • आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती असून मुख्यमंत्री स्वत: एका कार्यक्रमाला गेले आहेत.
  • मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते तिथीनुसार शिवजयंती साजरी करत आहेत.
  • शिवसेना, भाजपाच्या काही आमदारांनीदेखील महाराजांना वंदन केलं.
  • जयंतीच्या दिवशी जे महामानव आहेत त्यांचे फोटो लिफ्टसमोर ठेवतो आणि सदस्य पुष्प अर्पण करतात अशी प्रथा आहे.

 

पण राज्य सरकारची नेमकी भूमिका काय?

  • राज्याचे मुख्यमंत्री तिथीप्रमाणे शिवजंयती साजरी करत असताना राज्याचे अधिकारी आम्ही १९ फेब्रुवारीला साजरी करतो म्हणतात.
  • सरकारी अधिकाऱ्यांनी म्हणजे तिथी मान्य नाही म्हणणं म्हणजे ही द्विधा मनस्थिती आहे.
  • ही परिस्थिती चांगली नाही.
  • काँग्रेसच्या एका नेत्यानेही तिथीनुसार साजरी करा असं सांगितलं आहे.
  • पण जर मुख्यमंत्री साजरी करत असतील तर तसे आदेश द्यावेत.

अजित पवारांनी सुधीरभाऊंना भाजपा सत्ताकाळातील शिवजयंतीची आठवण करून दिली…

  • हे सरकार येण्याआधी अर्थमंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी काम केलं.
  • मीदेखील पाच वर्ष येत होतो पण तेव्हा कधीही तिथीनुसार शासकीय पातळीवर शिवजयंती साजरी झाली नाही.
  • अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तिथी किंवा तारखेचा वाद नको…ते आपले दैवत आहे हे त्रिवार सत्य आहे.
  • पण मागील काळात आम्ही सरकारमध्ये होतो तेव्हा स्वर्गीय रामकृष्ण मोरे एका खात्याचे मंत्री होते.
  • त्यांनी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० साली झाला हे रेकॉर्डवर आणलं.
  • तेव्हापासून राज्याचे मुख्यमंत्री शिवरायांचा जन्म झाला त्या शिवनेरीवर जाऊन अभिवादन करुन जयंती साजरी करतात.
  • ही परंपरा कायम असून सर्व मुख्यमंत्र्यांनी कायम ठेवली आहे.
  • सरकारच्या वतीने १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली जाते.

 

शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे विमानतळाजवळील कार्यक्रमाला गेले…

  • राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख म्हणून तिथे गेले होते.
  • स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे होते तेव्हापासून शिवसेना तिथीनुसार जयंती साजरी करत आली आहे.
  • आम्हीदेखील सरकारमध्ये असताना तारखेप्रमाणे साजरी करायचो.
  • शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, सपा, भाजपा कोणत्याही पक्षाच्या सदस्याला तिथीप्रमाणे जयंती साजरी कराची असेल तर महाराजांच्या पुतळ्याला जाऊन अभिवादन करु शकतात.
  • कारण नसताना वेगळी चर्चा नको.
  • सरकारी अधिकाऱ्यांना १९ फेब्रुवारीला सुट्टी देतो त्याप्रमाणे ते साजरी करतात.
  • आज सुट्टी नसून काम सुरु आहे.
  • आपल्या प्रांगणात महाराजांचा पुतळा आहे तिथे जाऊन ज्यांना करायचं आहे त्यांनी अभिवादन करावं.
  • छोट्या फोटोपेक्षा मोठ्या पुतळ्यासमोर जाऊन करा ना.
  • उन्हात जाऊन करायला काही त्रास होतो का? सिंहासनावर बसलेले महाराज आहेत.

 

शिवसेनेच्या सुनील प्रभूंनी सांगितला अभिवादनाचा मार्ग…

  • सुधीरभाऊ म्हणतात इथं का शिवजंयती का नाही केली?
  • विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, शिवसेना-काँग्रेस सर्वच आमदारांनी महाराजांना हार घातला आणि विधानभवनात शिवजयंती साजरी केली.
  • तीपण शासकीयच आहे ना. महाराज एवढे महान आहेत की एखादा दिवस जयंती साजरी करून नाही तर ३६५ दिवस ती साजरी केली पाहिजे.

 

शेवट गोड झाला…

  • भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या शिवजंयतीसाठी अभिवादनाच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना प्रतोद यांनी स्पष्ट शब्दात मत मांडलं.
  • पण नंतर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा मांडत अभिवादनाची सोय करण्यात आली.
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्या प्रतिमेला अभिवातदन केले.

 


Tags: ajit pawarAssembly SessionChhatrpati Shivaji Maharaj Jayanticm uddhav thackerayMaharashtrasudhir mungantiwarsunil prabhu
Previous Post

नितीन गडकरींना संसदेत स्पायडरमॅन का म्हणाले खासदार?…जाळंच ते!

Next Post

गुगल क्रोम’ वापरत आहात? सरकारचा ‘हा’ अलर्ट नक्की वाचा…

Next Post
Alert

गुगल क्रोम' वापरत आहात? सरकारचा 'हा' अलर्ट नक्की वाचा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!