Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मराठा आरक्षण: संभाजीराजे छत्रपतींची आघाडी सरकारकडून फसवणूक! १५ मार्चची मुदत गेली, मागण्या तशाच! – चंद्रकांत पाटील

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sambhaji Chhatrapti

मुक्तपीठ टीम

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या अन्य मागण्यांच्या मुद्द्यावर विधानसभेत आवाज उठवला. आघाडी सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नसून खासदार संभाजीराजे छत्रपतींचीही सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांवर फसवणूक केली आहे, असा आरोप त्यांनी विधानसभेत केला. सरकारनेच नेमलेल्या भोसले समितीच्या सूचनांच्या अंमलबजावणीसाठी एकही पाऊल उचलण्यात आलेले नाही, असेही ते म्हणाले.

 

भोसले समितीच्या सूचनांवर काहीच नाही!

  • दोन वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर वारंवार मराठा समाज मागणी करते आहे, याच सरकारने नेमलेल्या भोसले समितीच्या सूचनांची अंमलबजाणी करा.
  • भोसले समितीने सुचवलेले पुरेसा डेटा समोर आला नाही, मराठा समाज सामाजिक आर्थिक मागास सिद्ध करता आला नाही.
  • तसं करण्यासाठी आणखी माहिती पाहिजे.
  • त्यात एकही पाऊल पुढे गेलेलो नाही.

 

जे फडणवीसांनी दिले, तेही काढले

  • मराठा आरक्षण मिळेपर्यंत माननीय देवेंद्रजींनी ज्या सोयी सुविधा मराठा समाजाला दिल्या. म्हणजे ज्या ओबीसी समाजाला त्याच मराठा समाजाला दिल्या जातील.
  • त्यात ६०५ कोर्सेसची निम्मी फी सरकार भरणार. त्यासाठी ७५० कोटी रुपये प्रत्येक वर्षाला दोन वर्षे भरण्यात आली. ते सूत्र या सरकारला मान्य नाही का?
  • अण्णासाहेब पाटील महामंडळ सरकारने बरखास्त केले.

 

छत्रपतींना आश्वासनं, मुदत संपली तरी पूर्ण केलेले नाही!

  • शाहू महाराजांचे वंशज खासदार संभाजीराजे छत्रपती यांना उपोषण करावे लागले.
  • २८ फेब्रुवारीला आघाडी सरकारने सह्या करून त्यांना त्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेचं आश्वासन दिले होते.
  • त्यातील काही मागण्यांसाठी मुदत देण्यात आली होती.
  • ती मुदतही संपली आहे.
  • सारथी केंद्राच्या आठ उपकेंद्रांसाठी जमीन उपलब्ध करून देणार. त्यासाठी १५ मार्चची मुदत होती. पण मुदत उलटली.
  • सारथीकडून कौशल्य विकासाचे प्रशिक्षण महिन्याभरात सुरु करण्यात येतील. नाही झाले.
  • अण्णासाहेब पाटील महामंडळाला निधी उपलब्ध करून देणार. दिला नाही.
  • आरक्षण मिळाले, रद्द झाले यादरम्यान ज्यांना नोकऱ्या मिळाल्या, त्यांच्या नोकऱ्यांचे आपण काय करणार आहोत, अद्याप काहीच नाही.
  • त्यांना नेमणूक पत्र दिले पाहिजे. दिलेले नाही.

 

सरकारकडून छत्रपतींची फसवणूक!

  • सरकार दिलेले आश्वासन न पाळून छत्रपतींचीही फसवणूक करत आहे.
  • मराठा समाजासाठी नव्याने आयोग नेमणार का, हेही कळले पाहिजे.

सरकारने याबाबतीत या अधिवेशनात स्पष्ट केले पाहिजे, अशी आग्रही मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.


Tags: BJPMaratha ReservationMVAsambhaji chhatrapatiचंद्रकांत पाटीलभाजपामराठा आरक्षणमहाविकास आघाडी सरकारसंभाजी छत्रपती
Previous Post

युक्रेनचा चर्चेचा प्रस्ताव रशिया स्वीकारणार की तिसऱ्या महायुद्धाची भीती सार्थ ठरणार?

Next Post

नितीन गडकरींना संसदेत स्पायडरमॅन का म्हणाले खासदार?…जाळंच ते!

Next Post
Nitin gadkari

नितीन गडकरींना संसदेत स्पायडरमॅन का म्हणाले खासदार?...जाळंच ते!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!