Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राजभवन X विधानभवन: सहकारी कायदा सुधारणा विधेयक राज्यपालांनी परत का पाठवले?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Bhagat Singh Koshyari

मुक्तपीठ टीम

राज्यपाल भगत सिंग कोश्यारी आणि आघाडी सरकार यांच्यातील शीतयुद्ध आता उघड संघर्षात बदलले आहे. बारा आमदारांची नियुक्ती तशीच पडून असतानाच छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल राज्यपालांनी काढलेले उद्गार वाद भडकवणारे ठरलेले आहेत. हे सारं सुरु असतानाच राज्यपाल कोश्यारी यांनी आघाडी सरकारला नवा धक्का दिला आहे.
आघाडी सरकारचे सहकार कायदा सुधारणा विधेयक राज्यपालांनी फेरविचारार्थ परत पाठवले आहे. कोश्यारी यांनी या विधेयकामधील कलम १५७ च्या सुधारणेवर फेरविचार करण्याची सूचना करीत राज्यपालांनी हे विधेयक परत पाठविले आहे. या कलमाद्वारे आघाडीतील पक्षांना सहकारावर राजकीय वर्चस्व वाढवण्याची संधी मिळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 

आघाडी सरकारची सहकार कायद्यातील सुधारणा

  • केंद्र सरकारने केलेल्या ९७ व्या घटनादुरुस्तीच्या अनुषंगाने राज्य सरकारने २०१३ मध्ये सहकार कायद्याच्या विविध कलमांत सुधारणा केल्या होत्या.
  • मात्र, काही महिन्यांपूर्वी या घटनादुरुस्तीतील काही तरतुदी सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्या.
  • त्यामुळे राज्य सरकारने पुन्हा सहकार कायद्यात बदल करीत १० वर्षांपूर्वीचे नियम पुन्हा अमलात आणण्याचा निर्णय घेतला.
  • त्यानुसार विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सहकारी संस्थांच्या कामकाजात सुलभता आणण्याच्या हेतूने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमाच्या विविध कलमांत सुधारणा करण्यात आली.

विरोधी पक्षनेते फडणवीसांकडून सहकारावर कब्ज्याच्या प्रयत्नाचा आरोप

  • हिवाळी अधिवेशनात विधिमंडळात हे विधेयक मंजूर होताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या तरतुदीस आक्षेप घेतला होता.
  • या सुधारणांच्या माध्यमातून सरकारने पुन्हा सहकारावर कब्जा करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.
  • त्यानुसार १० वर्षांपूर्वी राज्य सरकारनेही सहकार कायद्यात सुधारणा करीत सहकारी संस्थांमध्ये सरसकट हस्तक्षेप करण्याचा सरकारचा अधिकार कमी केला होता.
  • मात्र,विरोधकांनी विधानसभेत हे विधेयक रोखण्याचा प्रयत्न केला होता.
  • सरकारने मात्र बहुमताने हे विधेयक मंजूर करून राज्यपालांकडे पाठविले होते.
  • कोश्यारी यांनी या विधेयकामधील कलम १५७ च्या सुधारणेवर फेरविचार करण्याची सूचना करीत राज्यपालांनी हे विधेयक परत पाठविले आहे.

 

राज्यपासांनी परत पाठवलेले विधेयक आता अधिवेशनात मंजूर करण्यात येणार

  • राज्यपालांनी विधिमंडळाकडे फेरविचारार्थ पाठविलेले विधेयक पु्न्हा याच अधिवेशनात मंजूर करण्यात येणार आहे.
  • तसे करताना त्या विधेयकात कोणत्याही सुधारणा केल्या जाणार नाहीत.

 

राज्यपालांनी परत पाठवलेल्या विधेयकाचं पुढे काय होतं?

  • विधिमंडळाने मंजूर केलेले विधेयक स्वाक्षरीसाठी राज्यपालांकडे जाते.
  • राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतरच त्याचे कायद्यात रुपांतर होते.
  • घटनेतील अनुच्छेद २००नुसार विधिमंडळाने मंजूर केलेलं विधेयक राज्यपाल फेरविचारार्थ विधिमंडळाकडे पुन्हा पाठवू शकतात.
  • विधिमंडळ आहे त्याच स्वरुपात किंवा बदल करून विधेयक मंजूर करू शकते.
  • त्यानंतर राज्यपालांना विधेयकाला संमती द्यावीच लागते.
  • तरीही या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यास कायदेशीर त्रुटी उद्भवू शकतात, असे राज्यपालांचे मत झाल्यास ते विधेयक राज्यपाल हे राष्ट्रपतींकडे पाठवू शकतात शकतात.

Tags: bhagat singh koshyariMVAदेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्रमहाविकास आघाडीराज्यपाल भगत सिंग कोश्यारीविधीमंडळसहकारी कायदा सुधारणा विधेयक
Previous Post

कूपरेज बँडस्टँड येथे रंगणार एनसीपीए अॅट दी पार्क संगीत व कला महोत्सव

Next Post

पोलीस आयुक्तांशी संपर्क साधायचा आहे? ९८६९७०२७४७वर एसएमएस, व्हॉट्सअॅप करा! फेसबुकवरही आहेत!!

Next Post
Sanjay Pandey

पोलीस आयुक्तांशी संपर्क साधायचा आहे? ९८६९७०२७४७वर एसएमएस, व्हॉट्सअॅप करा! फेसबुकवरही आहेत!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!