मुक्तपीठ टीम
गुरुवारचं महाराष्ट्रातील सत्तातराचं नाट्य सर्वांना धक्का देणारं होतं. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद देणार असून भाजपाचा या सरकारला बाहेरून पाठिंबा असेल असा स्वत: देवेंद्र फडणीवस यांनी घोषीत केलं होतं, मात्र शपथविधी पुर्वी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशानंतर फडणवीसांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलं. यासंपूर्ण घटनेवर अनेक तर्कवितर्क काढले जात आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. आणि त्याला बुद्धिबळ असं कॅप्शन दिलं आहे.
संदीप देशापांडे यांच्या ट्वीटमध्ये नेमकं काय?
#बुद्धिबळ pic.twitter.com/yRIkpwNjZo
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 1, 2022
- संदीप देशपांडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे.
- या व्हिडीओला त्यांनी बुद्धिबळ असं कॅप्शन दिलं आहे.
- या व्हिडीओत पंतप्रधान नरेंद्र मोदी बुद्धिबळाचा खेळ समजावत आहेत.
व्हिडीओत नेमकं काय बोलले पंतप्रधान मोदी?
- या व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, बुद्धिबळता प्रत्येक मोहऱ्याची आपली एक अशी स्वतंत्र ताकद असते, अद्वितीय क्षमता असते.
- तुम्ही एका प्यादाला घेऊन योग्य चाल खेळली, त्याच्या ताकदीचा योग्य उपयोग केलात तर तो मोहरा सर्वशक्तिशाली होतो.
- बुद्धिबळात ज्या प्यादाला सर्वात दुबळं मानलं जातं, तो मोहराही ताकदवान होऊ शकतो.
- फक्त सतर्कता आणि योग्य चाल खेळण्याची गरज असते.
- हे जमलं तर पटावरील साध्या प्यादालाही हत्ती, उंट आणि वजीराइतकी ताकद प्राप्त होते, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.