Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

संजय राऊतांची ईडी चौकशी! भगवं उपरणं, बेधडक वागणं!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
sanjay raut faces ed questioning bravely

मुक्तपीठ टीम

ईडीने दोन नोटीसा बजावल्याने शुक्रवारी शिवसेना खासदार संजय राऊत चौकशीसाठी कार्यालयात हजर राहिले. मात्र, चौकशीला जाताना त्यांच्या स्टाईल्सची सर्वात जास्त चर्चा होत आहे. संजय राऊत हे पांढरा शर्ट आणि गळ्यात भगव्या रंगाचा उपरणं गुंडाळून ईडी कार्यालयात दाखल झाले. त्यापुर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी “ईडीवर माझा विश्वास आहे” असं मोठं वक्तव्य राऊतांनी केलं आहे.

‘मी खूप निर्भय माणूस आहे…’

  • आज दुपारी १२ वाजता राऊतांनी ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.
  • राऊतांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली. राऊत हे सकाळी साडेअकरा वाजताच ईडी कार्यालयाजवळ पोहोचले.
  • ईडी चौकशीला सामोरे जाण्याआधी ईडी कार्यालयाबाहेर राऊतांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली.
  • संजय राऊत यांनी ईडी कार्यालयाबाहेर प्रसारमाध्यमांना सांगितले की, ‘मी खूप निर्भय माणूस आहे कारण मी माझ्या आयुष्यात कधीही चूक केली नाही.’, ‘हे सर्व राजकीय आहे का ते नंतर कळेल. सध्या, मला वाटते की मी तटस्थ एजन्सीकडे जात आहे आणि माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे.

यापूर्वी संजय राऊतांचे ईडीला आव्हान!

  • अलीकडेच संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाईवरून केंद्र सरकारवर आरोप केला होता.
  • हिंमत असेल तर मला अटक करा, गोळ्या घाला किंवा शिरच्छेद करा, पण ते गुवाहाटीला जाणार नाही, असे आव्हान त्याने ईडीला दिले होते.
  • मात्र, उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राऊत यांचा सूर बदलला.

पत्राचाळ घोटाळा आहे तरी काय?

  • मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोरेगावमध्ये पत्रा चाळ आहे.
  • त्या चाळींच्या पुनर्विकासाच्या मोठ्या प्रकल्पासाठी खूप स्पर्धा होती.
  • त्यात एचडीआयएलही सहभागी होती.
  • ही पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प १०३४ कोटींचा असल्याचे समजते.
  • याप्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ईडीने यापूर्वीच अटक केली आहे.
  • या प्रकरणी गेल्या आठवड्यात आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे.
  • राऊतांच्या मुलींच्या कंपनीत भागीदार असलेल्या सुजित पाटकर यांच्या घरावरही यापूर्वी ईडीने छापेमारी केली होती.
  • शिवाय संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून केलेल्या ५५ लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली होती.
  • त्यानंतर संजय राऊत यांनी ते ५५ लाख परतही केले होते.
  • या प्रकरणी त्यांची चौकशीही झाली.
  • संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधवी राऊत आणि वर्षा राऊत यांच्यात झालेले आर्थिक व्यवहार ईडीच्या रडारवर आहेत.
  • त्या व्यवहारातूनच हे प्रकरण थेट राऊतापर्यंत पोहचल्याचे समोर येत आहे.

Tags: EDMaharashtrasanjay rautShivsenaईडीपत्राचाळ घोटाळामहाराष्ट्रसंजय राऊत
Previous Post

शिंदे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री! खेळ खेळला कुणी? मनसेच्या देशपांडेंनी ट्वीट केला मोदींचा व्हिडीओ…

Next Post

राज्यात ३२४९ नवे रुग्ण, ४१८९ रुग्ण बरे! मुंबई ९७८, नाशिक २३, नागपूर २४ नवे रुग्ण !!

Next Post
राज्यात २९५६ नवे रुग्ण, २१६५ रुग्ण बरे! मुंबई १७२४, नाशिक २, नागपूर ५ नवे रुग्ण !!

राज्यात ३२४९ नवे रुग्ण, ४१८९ रुग्ण बरे! मुंबई ९७८, नाशिक २३, नागपूर २४ नवे रुग्ण !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!