Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गोव्यात भाजपामध्ये अस्वस्थता पेरणारे उत्पल पर्रीकर! त्यांच्याविषयी सर्व काही…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
utal parrikar

मुक्तपीठ टीम

गोव्यात येत्या १४ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. दिवस व्हलेन्टाइन डे म्हणून प्रेमाचा दिवस साजरा होणारा, त्यातही पुन्हा गोव्यासारखं रोमँटिक ठिकाण. पण अशा वातावरणात सत्ताधारी भाजपाने एका तरुणाचे ह्रदय दुखावले आहे. हा तरुण म्हणजे उत्पल पर्रीकर. भाजपाने गुरुवारी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली असताना त्यात उत्पलचे नाव नाही. उत्पल कदाचित परिवारामुळे शांत होईलही, मन दुखावल्यामुळे होणार नाही, पण त्याच्या बंडाच्या भाषेमुळे भाजपाच्या कडवट समर्थकांच्या मनातही चलबिचल नक्कीच झाली. त्यामुळे भाजपाला गोव्यात रुजवणाऱ्या, वाढवणाऱ्या मनोहर पर्रीकरांच्या मुलाबद्दल माहिती देणे आवश्यक आहे.

 

कोण आहेत उत्पल पर्रीकर?

  • उत्पल पर्रीकर हे भारताचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र आहेत.
  • मनोहर पर्रीकर यांना दोन मुलं, उत्पल आणि अभिजीत.
  • उत्पल हे अमेरिकेतील मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीचे पदवीधर आहेत.
  • उत्पल यांच्या पत्नीचे नाव उमा सरदेसाई आहे.
  • उमा यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे.
  • त्यांना ध्रुव नावाचा मुलगा आहे.

 

मनोहर पर्रीकरांचं राजकीय वारसा पुढे नेण्याचा उत्पलचा संकल्प

  • मनोहर पर्रीकर हयात असतानाही उत्पल पडद्यामागून सक्रिय होते.
  • मात्र, थेट राजकारणात ते कधीही सक्रिय नव्हते.
  • उत्पल पर्रीकर भाजपा नाराज आहेत कारण त्यांना त्यांच्या वडिलांच्या परंपरागत मतदारसंघ असणाऱ्या पणजीतून विधानसभा निवडणूक लढवायची इच्छा होती.
  • मात्र, पक्षाने त्यांना उमेदवारीबाबत कधीच विश्वासात घेतले नाही, त्यामुळे त्यांनी पणजीत प्रचार सुरू केला.
  • गोव्याची जबाबदारी असणारे भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा नेत्यांचा मुलगा म्हणून कोणाला उमेदवारी देत नाही, असे म्हटल्याने उत्पल अधिक संतापले.
  • यानंतर उत्पलही संतापले. ते जाहीररीत्या म्हणाले, “गोव्यात ज्या प्रकारचे राजकारण सुरू आहे, मी त्याला सहन करू शकत नाही. जिंकण्याची क्षमता हा एकमेव निकष आहे का? चारित्र्य आणि प्रामाणिकपणा यामुळे काही फरक पडत नाही?”

 

उत्पलना पणजीतूनच उमेदवारी का पाहिजे होती?

  • गोव्यातील पणजी विधानसभेच्या जागेवर भाजपाचे दीर्घकाळ वर्चस्व आहे.
  • मनोहर पर्रीकर येथून सहा वेळा आमदार होते.
  • १९९४ मध्ये ते या जागेवरून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते.
  • त्यानंतर १९९४, २००२, २००७, २०१२ मध्येही ते आमदार झाले.
  • २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर मनोहर पर्रीकर केंद्रात गेले आणि संरक्षण मंत्री झाले.
  • पर्रीकर २०१७ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत संरक्षण मंत्री राहिले.
  • त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आणि पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री झाले.
  • २०१७ मध्ये पर्रीकर पुन्हा या जागेवरून विजयी झाले.
  • पर्रीकर यांचे १७ मे २०१९ रोजी निधन झाले.
  • त्यांच्या निधनानंतर या जागेवरील पोटनिवडणुकीत काँग्रेसचे अतानासियो मोन्सेरात विजयी झाले, जे आता भाजपामध्ये आहेत.
  • उत्पल या जागेवरून तिकिटाची मागणी करत आहेत.
  • तेथून आता भाजपाने बार्बोस यांना उमेदवारी दिली आहे.

 

जर उत्पल शांत झाले तरीही अस्वस्थता पेरली गेली…

  • उत्पल पर्रीकर यांनी पणजीतून विधानसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह सोडावा, असे सुचवत फडणवीसांनी दोन पर्याय दिले आहेत.
  • भाजपाने त्यांना पणजी किंवा इतर ठिकाणी राष्ट्रीय कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी देण्याची ऑफर दिली आहे.
  • उत्पल यांना शिवसेना, आप आणि तृणमूल काँग्रेसनेही ऑफर दिली आहे.
  • अद्याप उत्पल यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.
  • स्थानिक राजकीय जाणकारांच्या मते उत्पल शांत झाले, बंड केले नाही तरी त्यांच्या वेगळ्या भूमिकेमुळे भाजपाचा मूळ आधार असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या, मतदारांच्या मनात अस्वस्थता मात्र पेरली गेली आहे.

Tags: BJPdevendra fadanvisGoautpal parrikarउत्पल पर्रिकरगोवादेवेंद्र फडणवीसभाजपा
Previous Post

लसीकरणाविरोधात मोहीम राबवणाऱ्या गायिकेचा कोरोनाने मृत्यू!

Next Post

सावधान! आताची लढाई अधिक अवघड बनलीय!

Next Post
Deepak kedar

सावधान! आताची लढाई अधिक अवघड बनलीय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!