मुक्तपीठ टीम
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, डिसेंबर २०२२ मध्ये शहरी बेरोजगारीचा दर १०.०९ टक्क्यांवर पोहोचलाआहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये हा आकडा ८.९६ टक्के होता. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बेरोजगारीचा दर ८.३० टक्के होता. ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये ७.५५ टक्क्यांवरून ०.११ टक्क्यांनी घसरून ७.४४ टक्क्यांवर आला होता. गेल्या १६ महिन्यांमधील देशातील बेरोजगारी सर्वोच्च स्तरावर पोहोचली आहे. जाणून घ्या कोणत्या राज्यात किती…
१० महिन्यांत सर्वाधिक रोजगार दर…
- सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीचे व्यवस्थापकीय संचालक महेश व्यास म्हणाले की, बेरोजगारीचा दर वाढलेला दिसतो तितका वाईट नाही.
- यापूर्वी कामगार सहभागाच्या दरात चांगली वाढ झाली आहे.
- डिसेंबरमध्ये कामगार सहभागाचा दर ४०.४८ टक्क्यांपर्यंत वाढला होता.
- हा १२ महिन्यांतील सर्वोच्च आहे.
- डिसेंबरमध्ये रोजगाराचा दर ३७.१ टक्क्यांवर पोहोचला आहे.
- हा आकडा जानेवारी २०२२ नंतर म्हणजेच १० महिन्यांतील सर्वाधिक आहे.
हरियाणात सर्वाधिक बेरोजगार!
- हरियाणामध्ये बेरोजगारीचा दर सर्वाधिक होता.
- हरियाणात हा दर ३७.४ टक्के वाढला.
- राजस्थानमध्ये २८.५ टक्के आणि दिल्लीत २०.८ टक्क्यांपर्यंत पोहोचला.
- राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) नुसार, २०२२-२३ च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत देशातील बेरोजगारीचा दर ७.२ टक्क्यांवर आला आहे.
- एप्रिल ते जून या तिमाहीत तो ७.६ टक्के होता.