मुक्तपीठ टीम
व्हॉट्सअॅप जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. त्याचा उपयोग संदेश पाठवण्यासोबतच फोटो आणि व्हिडिओ पाठवण्यासाठीही मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, व्हाट्सअॅप वर फोटो किंवा व्हिडिओ समोरच्याला पाठवले असता व्यवस्थित अर्थात चांगल्या दर्जाचे दिसत नाहीत. याचे कारण असे आहे की व्हाट्सअॅप आपल्या मीडिया फाइल्सना कंप्रेस करुन पुढे पाठवत असते. अर्थात असे असले तरी जर तुम्हाला कोणाला एचडी क्वालिटी फोटो-व्हीडिओ पाठवायचे तर शक्य आहे.
इथे आम्ही आपल्याला ज्या व्हाट्सअॅप ट्रिक्स सांगणार आहोत, त्याद्वारे तुम्ही मूळ दर्जामध्ये फोटो आणि व्हिडिओ पाठवू शकता.विशेष गोष्ट म्हणजे त्यासाठी आपल्याला कोणत्याही दुसऱ्या अॅपची गरज नाही, हे काम सरळ व्हाट्सअॅपने करत येईल.
दर्जा कमी न करताही व्हाट्सअॅपवर कसे पाठवावे एचडी फोटो?
- आपला व्हाट्सअॅप सुरू करा आणि कॉन्टॅक्ट्समध्ये जा, ज्यांना आपल्याला फोटो पाठवायचा आहे .
- चॅट स्क्रीन वर सर्वात खाली आपल्याला कॅमेरा आयकनच्या बाजुला अटॅचमेंटचा पर्याय दिसेल.
- अटॅचमेंट आयकॉनवर क्लिक कराति, तेथे कॅमेरा,ऑडिओ सोबत आणखी पर्याय येतील.
- तेथे असलेल्या डॉक्युमेंट या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर फोटो/व्हिडीओ निवडा, जो पाठवायचा असेल.
- जर आपल्याला फोटो/व्हिडीओ मिळत नसेल तर ब्राउज अदर डॉक्युमेंट हा पर्याय निवडा.
- आता फोटो/व्हिडीओ निवडून सेंड बटण वर क्लिक करा
- अश्या प्रकारे फोटो/व्हिडीओ मूळ दर्जाचाच पाठवला जाइल.