Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी कार्यरत व्यक्ती-संस्थांना केंद्र सरकारचे नारी शक्ती पुरस्कार

नारी शक्ती पुरस्कारासाठी नामांकन अर्ज पाठवण्याचे केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे आवाहन

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Nari Shakti Award

मुक्तपीठ टीम

महिला आणि बाल विकास मंत्रालयाने नारी शक्ती पुरस्कार-२०२१ साठी नामांकन अर्ज पाठवण्याचे आवाहन केले आहे. अर्ज/नामांकने केवळ ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारली जातील आणि www.awards.gov.in या पोर्टलवर हे अर्ज सादर करता येतील. ३१ जानेवारी २०२२ पर्यंत प्राप्त झालेले सर्व अर्ज/नामांकने वर्ष २०२१ च्या नारी शक्ती पुरस्कारासाठी विचारात घेतली जातील.

 

महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या वतीने नारी शक्ती पुरस्कार-२०२१ हा आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त म्हणजेच ८ मार्च २०२२ रोजी प्रदान केला जाईल.

 

नारी शक्ती पुरस्कार कोणाला?

  • महिला सक्षमीकरणासाठी विशेषत: असुरक्षित आणि उपेक्षित महिलांसाठी केलेल्या सेवाकार्यासाठी, व्यक्ती आणि संस्थांना महिला आणि बाल विकास मंत्रालय दरवर्षी नारी शक्ती पुरस्कार प्रदान करते.
  • प्रत्येक पुरस्कारार्थीला दोन लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • हे पुरस्कार सर्व व्यक्ती आणि संस्थांसाठी खुले आहेत.

 

नारी शक्ती पुरस्काराची प्रक्रिया काय?

  • पुरस्कारांची कमाल संख्या (वैयक्तिक आणि संस्था मिळून ) १५ असू शकते. तथापि, महिला आणि बाल विकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीच्या अधिकारानुसार या कमाल संख्येला कोणतीही शिथिलता देण्यासाठी अनुमती दिली जाऊ शकते.
  • या पुरस्कारांसाठी स्व-नामांकन आणि शिफारसी देखील विचारात घेतल्या जातात.
  • निवड समिती पुरेशा समर्थनासह या पुरस्कारासाठी एखाद्या व्यक्तीची/संस्थेची शिफारस देखील करू शकते.
  • महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या संयुक्त सचिव स्तरावरील अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखालील एक छाननी समिती, पुरस्कारांसाठी अर्ज केलेल्या/शिफारस केलेल्या संस्था आणि व्यक्तींच्या कामगिरीचा विचार करून, पुरस्कारांसाठी प्राप्त झालेल्या नामांकनांची छाननी करेल.
  • त्यातून निवडलेल्या अर्जांची यादी तयार करेल. पुरस्कार विजेत्यांची अंतिम निवड छाननी समितीच्या शिफारशींच्या आधारे, केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीद्वारे केली जाते.

 

नारी शक्ती पुरस्कारासाठी पात्रता निकष कोणते?

नारी शक्ती पुरस्कारासाठी पात्रता निकषा संबंधीची मार्गदर्शक तत्वे आणि इतर तपशील https://wcd.nic.in/acts/guidelines-nari-shakti-puraskar-2021-onwards वर उपलब्ध आहे.


Tags: central GovernmentEconomic and Social Empowermentgood newsmuktpeethNari Shakti AwardUnion Ministry of Women and Child DevelopmentWomenआर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणकेंद्र सरकारकेंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयगुड न्यूजनारी शक्ती पुरस्कारमहिलामुक्तपीठ
Previous Post

सहा हजार ग्रामपंचायतींमध्ये उभारणार स्वयंचलित हवामान केंद्रे, हवामानाचा अधिक योग्य अंदाज

Next Post

व्हॉट्सअॅपवरील भन्नाट ट्रिक, एचडी क्वालिटीमध्ये पाठवू शकाल फोटो-व्हिडीओ!

Next Post
wa

व्हॉट्सअॅपवरील भन्नाट ट्रिक, एचडी क्वालिटीमध्ये पाठवू शकाल फोटो-व्हिडीओ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!