मुक्तपीठ टीम
मक्तेदारी चांगली नसते. त्यात ग्राहकांचा तोटा होतो. गेली अनेक वर्षे व्हॉट्सअॅपची मॅसेजिंगच्या दुनियेत मक्तेदारी तयार झाली होती. त्यामुळे वाट्टेल ते नियम अटी लादणं सुरु होतं. आता मात्र प्रायव्हसी संपवण्याच्या वादानंतर व्हॉट्सअॅप अडचणीत येऊ लागला आहे. गेल्या ७२ तासात अडीच कोटी नवीन यूजर्सनी टेलिग्रामला पसंती दिली आहे. त्यामुळे टेलिग्राम यूजरची संख्या पाच कोटींवर गेली आहे.
कंपनीने जगभरात नवीन यूजर्स तयार केले आहेत. यात आशियामधील ३८ टक्के यूजर्स आहेत. तसेच युरोपमधून २७ टक्के, लॅटिन अमेरिकेतून २१ टक्के आणि एमइएनए मधून ८ टक्के यूजर्स आहेत. यासह, टेलीग्रामने ५ कोटी यूजर्सची संख्या ओलांडली आहे.
नवीन व्हॉट्सअॅप पॉलिसी अस्तित्त्वात आल्यानंतर सिग्नल प्रमाणेच टेलिग्राम डाउनलोड करणारे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. व्हॉट्सअॅपच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीनंतर वापरकर्त्यांमध्ये डेटाबाबत चिंता आहे. यूजर्स अधिक सुरक्षित आणि खाजगी असलेल्या इतर संदेश प्लॅटफॉर्म शोधत आहेत. एलॉन मस्क यांनी फेसबुकच्या मालकीच्या व्हॉट्सअॅपला वापर करण्यास नकार दिला आहे.
व्हॉट्सअॅपच्या पॅालिसीत बदल झाल्यानंतर भारतात सिग्नल आणि टेलिग्रामचे डाउनलोड्स वाढून ४० लाख झाले आहेत. ६ ते १० जानेवारी दरम्यान २ कोटी ३० लाख नवीन डाउनलोडसह सिग्नलने या शर्यतीत प्रथम स्थान मिळविला. त्याच वेळी, टेलिग्रामने या कालावधीत दीड कोटी नवीन डाउनलोड्स मिळविले.
पाहा व्हिडीओ: