Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

व्हॉट्सॲपची प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारली नाही तर काय होईल?

February 24, 2021
in लेटेस्ट टेक
0
whatsapp

मुक्तपीठ टीम

व्हॉट्सॲप आपल्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीमुळे मागील काही दिवसांपासून वादामध्ये अडकले आहे. अनेक युजर्सने इतर प्लॅटफॉर्मवर स्विच करणे सुरु केले होते. परंतु कंपनीने मागील आठवड्यात, ते पॉलिसी अपडेट करून पुढे जातील परंतु युजर्सला संपूर्ण माहिती दिल्याशिवाय जाणार नाहीत असे सांगिलते होते.

तुम्हाला माहिती आहे का, १५ मे पर्यंत तुम्ही व्हॉट्सॲपच्या नवीन पॉलिसीचा स्वीकार न केल्यास काय होईल? कंपनीने या सर्व प्रश्नाची उत्तरे आपल्या फेसबुक ब्लॉगवर दिले आहेत.

 

नवीन पॉलिसी स्वीकारली नसल्यास काय होईल?

  • युजरने १५ मे पर्यंत व्हॉट्सॲपची नवीन प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारली नसल्यास व्हॉट्सॲप लगेच युजरचे अकाउंट डिलीट करणार नाही. परंतु कंपनीने हेसुद्धा सांगितले आहे की, पॉलिसी एक्स्पेट करेपर्यंत सर्व फंक्शनचा लाभ मिळणार नाही.
  • काही काळ युजर्स कॉल्स आणि नोटिफिकेशन रिसिव्ह करून शकतील परंतु ॲपवरून मॅसेज वाचू शकणार नाहीत आणि पाठवूही शकणार नाहीत. काही काळाचा अर्थ असा आहे की, युजर्सने पॉलिसी मान्य केली नाही तरी काही आठवडे व्हॉट्सॲप वापरू शकतील.
  • या व्यतिरिक्त व्हॉट्सॲप युजर्सला आणखी काही ऑप्शन उपलब्ध करून देईल. युजर्स १५ मे नंतरसुद्धा ॲपचे अपडेट्स प्राप्त करू शकतील. १५ मे पूर्वी आपली चॅट हिस्ट्री अँड्रॉइड किंवा आयफोनवर एक्स्पोर्ट करू शकतील. यासोबतच अकाउंटचा रिपोर्टही डाउनलोड करू शकतो.

 

अकांऊट डिलीट केल्यास परत मिळणार नाही
जर तुम्ही तुमच्या अँड्रॉइड, आयफोन किंवा काईओएस (KaiOS) डिव्हाईसने आपले अकाउंट डिलीट केल्यास ते पुन्हा मिळणार नाही. सर्व मॅसेज आणि डेटा पूर्णपणे डिलीट होईल आणि तुम्ही सर्व व्हॉट्सॲप गृपमधूनही रिमूव्ह व्हाल. कंपनीनुसार व्हॉट्सॲप बॅकअपसुद्धा डिलीट केले जाईल.

व्हॉट्सअॅपने वापरकर्त्याला योग्य माहिती देण्यासाठी मोहीम सुरू केली

  • कंपनीने नमूद केले की “त्यांनी बर्‍याच लोकांकडून ऐकले आहे की त्याच्या अलीकडील अपडेटबाबत संभ्रम आहे. निराकरण करण्यासाठी त्यांनी सर्वांना ते त्यांचे तत्त्वे आणि वस्तुस्थिती समजून घेण्यास मदत करतील.
  • नवीन पॉलिसीबद्दल यूजर्सना सांगण्यासाठी व्हॉट्सअॅपने एक नवीन कॅम्पेन सुरू केला आहे. व्हॉट्सअ‍ॅप आता चॅट विंडोच्या वरच्या बाजूस एक लहान बॅनर शो करेल. व्हॉट्सअॅप एक-दोन आठवड्यांत यूजर्ससाठी छोटा बॅनर दाखवण्यास सुरवात करेल. बॅनरच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप यूजर्सना पॉलिसी कशी बदलता येतील आणि व्हॉट्सअॅप यूजर्सकडून किती माहिती गोळा करेल याची माहिती देईल.
  • यूजर्सना प्रथम पॉलिसींचा आढावा घेण्याचा आणि नंतर त्यांना स्वीकारण्याचा पर्याय देण्यात येईल. चॅटच्या शीर्षस्थानी बॅनर दिसेल आणि यूजर्सना ‘Tap to review’ वर क्लिक करावे लागेल. एकदा रोलआउट झाल्यावर, व्हॉट्सअॅप यूजर्सना गोपनीयता अटी वाचण्याची आणि नंतर नवीन अपडेट स्वीकारण्यास आठवण करुन देईल.

 

व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन धोरण काय आहे?
व्हॉट्सअ‍ॅप यूझर जे कंटेंट अपलोड, सबमिट, स्टोअर, सेंड किंवा रिसीव करतात, कंपनी त्याचा वापर कुठेही करू शकणार. कंपनी त्या डाटाला कुठेही शेअर करू शकेल. ही पॉलिसी ८ फेब्रुवारी २०२१ पासून लागू होणार होती. पण, वाद वाढल्यानंतर डेडलाइनला वाढवून १५ मे करण्यात आले. आधी दावा करण्यात आला होता की, युझरने या पॉलिसीला अ‍ॅग्री न केल्यास व्हॉट्सअ‍ॅप बंद होणार. पण, नंतर याला ऑप्शनल सांगण्यात आले.


Tags: whatsappWhatsApp Privacy Policyअँड्रॉइडव्हॉट्सॲपव्हॉट्सॲप प्रायव्हसी पॉलिसी
Previous Post

जगात सर्वात मोठं झालं…पण आता सरदार पटेल नाही…नरेंद्र मोदी स्टेडियम!

Next Post

शेतकरी आंदोलनस्थळी पोलिसांचा कडक इशारा देणारा फलक

Next Post
protest

शेतकरी आंदोलनस्थळी पोलिसांचा कडक इशारा देणारा फलक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!