मुक्तपीठ टीम
इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचा वापर सर्वच करतात. हे आपल्याला आपल्या जवळच्या लोकांशी जोडलेले राहण्यास मदत करते. याच्या मदतीने आपण आपल्या मित्र-मैत्रिणींशी आणि नातेवाईकांशी हवं तेव्हा कनेक्ट होऊ शकतो. आता व्हॉट्सअॅप त्यांच्या प्लॅटफॉर्मवर नवनवीन फिचर्स आणण्यात व्यग्र आहे. व्हॉट्सअॅपवर नुकतेच कंपेनियन मोड फिचर जोडण्यात आले आहे. या फिचरमुळे एकाच वेळी दोन ठिकाणी कनेक्ट होता येणार आहे.
व्हॉट्सअॅप कंपेनियन मोड फिचर कसा असणार?
- व्हॉट्सअॅपवर कंपेनियन मोड फिचर जोडण्यात आलेले आहे.
- व्हॉट्सअॅपच्या या फिचरच्या मदतीने स्मार्टफोन आणि टॅबलेटवर एकाच वेळी एकाच नंबरवरून व्हॉट्सअॅप वापरता येणार आहे.
- यासाठी टॅबवर वेगळे अकाउंट तयार करावे लागणार नाही.
एकाच वेळी चार उपकरणांवर व्हॉट्सअॅप वापरता येणार!
- व्हॉट्सअॅपच्या कंपेनियन मोडच्या मदतीने, यूजर्स एकाच वेळी त्यांच्या स्मार्टफोनसह आणखी ३ डिव्हाइसवर कनेक्ट राहू शकतात.
- व्हॉट्सअॅपने हे फिचर अँड्रॉइड बीटा यूजर्ससाठी जारी केले आहे. . हे फिचर यूजर्सना नोंदणी स्क्रीनच्या मदतीने एकाच वेळी एकाधिक डिव्हाइसवर WhatsApp वापरण्याचे स्वातंत्र्य देईल.
- जेव्हा पहिले अकाउंट दुसर्या डिव्हाइसवर लिंक केल्यास, स्मार्टफोनवरील डेटा आपोआप इतर डिव्हाइसशी सिंक होईल.
- अकाउंटशी संबंधित सर्व माहिती एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असेल.
- यासोबतच, जेव्हा कोणी व्हॉट्सअॅपवर मेसेज करेल, तेव्हा तो मेसेज एकाच वेळी सर्व डिव्हाइसवर पोहोचेल.
व्हॉट्सअॅपचे हे कंपेनियन मोड फिचर फक्त बीटा यूजर्सना दिले जात आहे. सर्वसामान्य यूजर्सही या फिचरचा वापर करू शकतील, अशी अपेक्षा आहे.
व्हॉट्सअॅप कंपेनियन मोड फिचर जनरेट करण्यासाठी सोप्या स्टेप्स!
- स्मार्टफोनवर Google Play Store उघडा.
- सर्च बारवर जाऊन WhatsApp शोधा.
- WhatsApp चे पेज उघडल्यावर खाली स्क्रोल करा, येथे Become a Beta Testerचा पर्याय दिसेल.
- हा पर्याय निवडा आणि I’m In वर क्लिक करा.
- त्यानंतर Join या पर्यायावर क्लिक करा.