मुक्तपीठ टीम
व्हॉट्सअॅपवर एक व्हायरल ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जातो की साधू आणि फकीरांच्या वेशात अपहरणकर्ते मुलांचे अपहरण करण्याच्या संधीच्या शोधात तेलंगणात फिरत आहेत. ऑडिओमध्ये पालक आणि शाळेतील शिक्षकांनाही सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात सांगलीमध्ये झालेल्या साधू मारहाण प्रकरणामागे अशीच ऑडिओ क्लिप जबाबदार असल्याची शक्यता आहे. पालघरमध्ये दोन साधूंची अमानुष हत्या झाली तेव्हाही तिथं व्हायरल झालेल्या व्हॉट्सअॅप पोस्ट मुलांच्या अपहरणासाठी साधूंच्या वेशात टोळी फिरत असल्याच्या अफवा पसरवत होत्या. मात्र, पालघरनंतर आता सांगलीतही गुन्ह्याच्या मुळापर्यंत जात अफवा पसरवणाऱ्यांचा शोध घेत कारवाई झालेली दिसली नाही.
राष्ट्रीय माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार अशा अफवांच्या ऑडिओ क्लिप्स, पोस्ट्स महाराष्ट्राशेजारील तेलंगणा, कर्नाटक या राज्यांमध्येही पसरल्या आहेत. विशेषत: महाराष्ट्रालगतच्या सीमाभागांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील घटना आणि व्हायरल अफवा यांचा संबंध शोधण्याची आणि त्यामागील खरे सूत्रधार शोधण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.
व्हॉट्सअॅपवर व्हायरल झालेल्या ऑडिओत काय म्हटलं आहे?
- व्हॉट्सअॅपमध्ये व्हायरल झालेल्या ऑडिओ बातम्यांमध्ये म्हटले आहे की, “गावकऱ्यांना आणि शहरवासीयांना, ही माझी चेतावणी आहे.
- जर तुमचा मुलगा विद्यार्थी असेल आणि शाळा तुमच्या गावापासून दूर असेल, तर कृपया लक्ष ठेवा, अन्यथा, वाईट होऊ शकते.”
- पोलिसांनी अलर्ट जारी केला आहे की बाहेरून ४००-५०० गुंड आले आहेत आणि ही टीम सर्वत्र पसरली आहे. ते डोळे, किडनी आणि शरीराच्या इतर अवयवांसाठी मुलांचे अपहरण करत आहेत.
- अनेक वेशात हे गुंड तुमच्या गावात आणि शहरात येतात. जसे फेरीवाले, रद्दी विक्रेते, साधू आणि फकीर.
- जर तुम्ही त्यांना याआधी कधी पाहिले नसेल तर तुमचा मुख्य दरवाजा बंद ठेवा आणि खिडकीतूनच त्यांच्याशी बोला. तुमच्याकडे पाळीव कुत्रा असेल तर त्याची साखळी उघडा आणि त्यांच्यावर सोडा, “