Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सरकारी नियमांमुळे मॅसेज काय आणि कोणी पाठवला ते कळणार! व्हॉट्सअ‍ॅप सरकारविरोधात न्यायालयात!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
whatsapp (2)

मुक्तपीठ टीम

व्हॉट्सअ‍ॅपने दिल्ली उच्च न्यायालयामध्ये भारत सरकारविरोधात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत व्हॉट्सअ‍ॅपने बुधवारपासून जारी केलेल्या आयटी नियमांना स्थगिती द्यावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे. नव्या नियमांमुळे यूजर्सच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन होत असल्याचे व्हॉट्सअ‍ॅपने म्हटले आहे.

 

फेसबुकच्या मालकीच्या व्हॉट्सअ‍ॅपने मंगळवारी हा खटला दाखल केला आहे. या नियमांनुसार अ‍ॅपवर विशिष्ट मेसेज कोठून आला हे व्हॉट्सअ‍ॅपला सांगावे लागेल. याबाबत व्हॉट्सअ‍ॅपने म्हटले आहे की, “चॅट्सना ट्रेस करण्यास भाग पाडणारा हा कायदा व्हॉट्सअ‍ॅपवर येणाऱ्या प्रत्येक मेसेजवर फिंगरप्रिंट ठेवण्यासारखा आहे. संबंधित मेसेज कुणी पाठवला हे शोधणं म्हणजे आम्हाला प्रत्येक मेसेजवर लक्ष ठेवावं लागेल. जर आपण हे केले तर एंड-टू-एंड एन्क्रिप्शनला काही अर्थ उरणार नाही आणि लोकांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे देखील उल्लंघन केले जाईल.”

 

सरकारी नियमांमुळे मॅसेज काय आणि कोणी पाठवला ते कळणार!

  • व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या एफएक्यू पेजवरही याविषयी माहिती दिली आहे.
  • मात्र, कोणत्याही विशिष्ट देशाबद्दल अद्याप लिहिले गेले नाही, परंतु व्हॉट्सअ‍ॅपने या प्रकरणी भारत सरकारविरूद्ध याचिका दाखल केली आहे.
  • व्हॉट्सअ‍ॅपने म्हटले आहे की काही सरकार त्यांना ‘ट्रेसिबिलिटी’ करण्यास सांगत आहेत.
  • व्हॉट्सअ‍ॅपच्या मते ट्रेसिबिलिटी म्हणजे खरंतर कुणी संदेश पाठविला ते शोधणे.
  • व्हॉट्सअ‍ॅपने म्हटले आहे की ट्रेसिबिलिटीमुळे ‘एंड टू एंड’ एनक्रिप्शन ब्रेक होते आणि कोट्यवधी लोकांच्या गोपनीयतेस धोका असतो.
  • व्हॉट्सअ‍ॅपने २०१६ मध्ये ‘एंड-टू-एंड’ एन्क्रिप्शनला सुरूवात केली होती, त्याद्वारे केवळ कॉल, मेसेज, फोटो, व्हिडिओ आणि व्हॉइस नोट्स ज्या व्यक्तीस पाठवले त्या व्यक्तीस प्राप्त होईल.
  • हा मेसेज व्हॉट्सअ‍ॅप देखील वाचू किंवा पाहू शकत नाही असा त्यांचा दावा आहे.
  • मात्र, सरकारी नियमांमुळे प्रत्येक मॅसेज काय आहे आणि कोणी पाठवला त्याची नोंद ठेवावी लागेल.

Tags: Delhi High Courtwhatsappएंड-टू-एंड' एन्क्रिप्शनदिल्ली उच्च न्यायालयव्हॉट्सअॅप
Previous Post

मराठा आरक्षण, मराठ्यांच्या शिक्षण संस्था आणि गंगारामभाऊ म्हस्के

Next Post

“कोरोनाची भीती ही अटकपूर्व जामीनाचं कारण असू शकत नाही”- सर्वोच्च न्यायालय

Next Post
supreme court

"कोरोनाची भीती ही अटकपूर्व जामीनाचं कारण असू शकत नाही"- सर्वोच्च न्यायालय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!