Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतात खासगी ‘क्रिप्टोकरन्सी’वर बंदी येणार! जाणून घ्या नेमकं काय घडणार?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
What will happen with cryptocurrency in India

मुक्तपीठ टीम

केंद्र सरकारने भारतात खासगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी घातली घालण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्यासाठी भारत सरकार लवकरच कायदा आणणार आहे. यासंदर्भातील विधेयक संसदेत मांडण्याची तयारी सुरू आहे. केंद्र सरकारने हे विधेयक आणण्याच्या घोषणेनंतर क्रिप्टो मार्केटमध्ये खळबळ उडाली असून अचानक क्रिप्टोकरन्सी मार्केट कोसळले आहे.

संसदेचे हिवाळी अधिवेशन २९ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. संसदेच्या या अधिवेशनातच खाजगी क्रिप्टोकरन्सी विधेयक आणले जाईल. सभागृहाच्या कामकाजावरील अधिकृत दस्तऐवजात अशी माहिती देण्यात आली आहे की, आगामी हिवाळी अधिवेशनात क्रिप्टोकरन्सी आणि रेग्युलेशन ऑफ डिजिटल करन्सी बिल, २०२१ संसदेत सादर केले जाणार आहे.

 

रिझर्व्ह बँक आणणार डिजिटल चलन!

  • भारतात खासगी क्रिप्टोकरन्सीवर पूर्णपणे बंदी घालण्यात येणार असल्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे.
  • आरबीआय लवकरच स्वतःचे डिजिटल चलन जारी करणार आहे.
  • डिजिटल चलन खासगी हातात ठेवणे गुंतवणूकदारांसाठी घातक ठरू शकते, त्यामुळे सरकारला क्रिप्टोकरन्सीवर आरबीआयचे नियंत्रण हवे आहे.
  • यापूर्वी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया नेही असुरक्षित किरकोळ गुंतवणूकदारांचे हित लक्षात घेऊन भारतातील क्रिप्टोकरन्सीच्या अनियंत्रित वाढीबद्दल चिंता व्यक्त केली होती.

 

क्रिप्टोकरन्सी विधेयकामुळे काय घडणार?

  • क्रिप्टोकरन्सीच्या नियमनासाठी सरकार आणत असलेल्या विधेयकाचे नाव आहे क्रिप्टोकरन्सी आणि अधिकृत डिजिटल चलनाचे नियमन विधेयक, २०२१.
  • या विधेयकाद्वारे केंद्र सरकार अधिकृत क्रिप्टोकरन्सी जारी करू शकणार आहे.
  • या विधेयकाद्वारे सर्व खासगी क्रिप्टो करन्सीवर बंदी घालण्यात येणार आहे.

क्रिप्टोकरन्सीचा इतिहास

  • क्रिप्टोकरन्सीची आता अधिक चर्चा सुरु आहे.
  • जगात नव्वदीच्या दशकातच याबद्दल विचार करायला सुरुवात झाली.
  • नव्वदीच्या दशकाच्या सुरुवातीस, जेव्हा तांत्रिक क्रांती सुरू झाली, तेव्हा फ्लुझ, बीन्झ आणि डिजिकेश यांनी डिजिटल चलनाच्या रूपात पाय पसरवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यश आले नाही.
  • वास्तविक सुरुवातीला लोकांचा या डिजिटल चलनावर विश्वास बसत नव्हता.
  • यानंतर, २००९मध्ये सातोशी नाकामोटो या टोपणनावाने काम करणाऱ्या एका अज्ञाताने एक सॉफ्टवेअर विकसित केले.
  • त्यांनी सर्वप्रथम बिटकॉइनची कल्पना सर्वांसमोर ठेवली.
  • ब्लॉकचेन पद्धतीने काम करणाऱ्या बीट कॉईनच्या माध्यमातून जगभरात क्रिप्टोकरन्सीचा प्रसार झाला. विकासही.
  • उल्लेखनीय बाब म्हणजे, गेल्या काही वर्षांत क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणुकीत झपाट्याने वाढ झाली आहे.
  • बिटकॉइन व्यतिरिक्त, क्रिप्टोकरन्सीमध्ये अनेक खासगी डिजिटल चलने चलनात आहेत.
  • पण आजवर केवळ एका देशाने साल्वाडोरने क्रिप्टोकरन्सीला मान्यता दिली आहे.

Tags: central govtcryptocurrencyRBIकेंद्र सरकारक्रिप्टो मार्केटक्रिप्टोकरन्सीक्रिप्टोकरन्सी आणि रेग्युलेशन ऑफ डिजिटल करन्सी बिलरिझर्व्ह बँक
Previous Post

संविधान दिनी गडकरी रंगायतनमध्ये नाटक ‘सम्राट अशोक’ चा प्रयोग!

Next Post

आजच्या बैठकीत एसटी संपावर तोडग्याची शक्यता…अंतरिम पगारवाढ, अर्थसंकल्प विलिनीकरणावर तडजोड होणार?

Next Post
st bus

आजच्या बैठकीत एसटी संपावर तोडग्याची शक्यता...अंतरिम पगारवाढ, अर्थसंकल्प विलिनीकरणावर तडजोड होणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!