Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आजच्या बैठकीत एसटी संपावर तोडग्याची शक्यता…अंतरिम पगारवाढ, अर्थसंकल्प विलिनीकरणावर तडजोड होणार?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
st bus

मुक्तपीठ टीम

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण आणि इतर मागण्यासाठी सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर आज तोडगा निघण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सामान्य प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच संपामुळे सरकारविरोधात समाजातही असंतोष माजू लागला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी अर्थमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर अनिल परब यांनी ताठर भूमिका सोडत मध्यम मार्गाची भाषा सुरु केली. मंगळवारी सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या अंतरिम वेतनवाढीचा प्रस्ताव शिष्टमंडळापुढे ठेवण्यात आला. आताही त्यांची कर्मचारी नेते, प्रतिनिधींशी बोलणी सुरु आहेत.

 

कर्मचाऱ्यांना अंतरिम वेतनवाढीचा पर्याय

  • कामगारांना जे जे हवं आहे ते आम्ही देत आहोत.
  • एका बाजूने समितीची प्रक्रिया सुरू आहे.
  • याला बराच कालावधी लागणार आहे.
  • तिढा कायम राहू नये, यासाठी कर्मचाऱ्यांना अंतरिम वेतनवाढीचा पर्याय दिला आहे.
  • दरम्यान याच संदर्भात बुधवारी पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यामध्ये आज बैठक होणार आहे.

 

संप मागे घेण्याचे परबांचे आवाहन

  • कामगारांनी अधिक ताणू नये.
  • सरकार दोन पावलं पुढे यायला तयार आहे.
  • तुम्ही दोन पावलं मागे या.
  • चर्चेने मार्ग निघत असतो.
  • एसटी सेवा ठप्प असल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत.
  • त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा असे आवाहन देखील परब यांनी केले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघण्याची शक्यता

  • संपावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी मंगळवारी सांगितले होते.
  • त्यामुळे आजच्या बैठकीत संपावर तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
  • न्यायालयाने विलीनीकरणाचा विचार करण्यासाठी समिती नेमली आहे.
  • समितीचा जो काही अहवाल येईल तो सरकार मान्य करेल.
  • पण तोपर्यंत संप चालू राहू शकत नाही.
  • त्यामुळे कामगारांना अंतरिम वेतनवाढ देण्याचा पर्याय दिला आहे.
  • एसटी कर्मचाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
  • उच्च न्यायालयाने समिती बनवली आहे.
  • समितीकडे सध्या हा विषय आहे.
  • १२ आठवड्यात अहवाल द्यायचा आहे.
  • अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्री तो कोर्टात सादर करतील, कोर्टाच्या आदेशाचं कोणीच उल्लंघन करू शकत नाही.

Tags: Anil ParabST Strikeअनिल परबएसटी कर्मचारीएसटी महामंडळएसटी संप
Previous Post

भारतात खासगी ‘क्रिप्टोकरन्सी’वर बंदी येणार! जाणून घ्या नेमकं काय घडणार?

Next Post

मच्छिमारांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचे मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंचं आश्वासन

Next Post
Dattatray Bharne

मच्छिमारांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचे मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंचं आश्वासन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!