Thursday, June 5, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यसभेची ६वी जागा: निष्ठा की नोटा?

June 3, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Rajyasabha 6 Seat Electon

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातारवरण चांगलेच तापलं आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीने केलेल्या प्रयत्नांना भाजपाने प्रतिसाद दिला नाही. उलट जो प्रस्ताव आघाडीने दिला त्याच्या उलट ऑफर भाजपाने दिली. त्यामुळे आता सहाव्या जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी मतांची सोय करण्यासाठी आघाडी आणि भाजपात कमालीची चुरस होणार आहे.

महाविकास आघाडी नेत्यांच्या शिष्टमंडळाने सकाळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भाजपाने राज्यसभा निवडणुकीसाठी तिसरा उमेदवार मागे घ्यावा यासाठी महाविकास आघाडीने भाजपाला विधान परिषदेची एक जागा सोडण्याची ऑफर दिल्याची माहिती अन्न पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिली.

मविआची भाजपाला विधान परिषदेच्या जागेची ऑफर

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, शिवसेनेचे नेते खासदार अनिल देसाई, काँग्रेस नेते सुनिल केदार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
  • यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते.
  • महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने भाजपाने तिसरा उमेदवार मागे घ्यावा आणि राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती केली.
  • राज्यसभा निवडणुकीतून उमेदवार मागे घेतल्यास विधान परिषदेला एक जागा आणखी देऊ असा प्रस्तावही महाविकास आघाडीने भाजपाला दिला.
  • पण भाजपाने तो स्वीकारला नाही.

भाजपाची आघाडीला उलटी ऑफर!

  • आमचा प्रस्ताव दिल्यानंतर भाजपने त्यांचा प्रस्ताव दिला.
  • तुम्ही जो प्रस्ताव दिला, तो उलटा का करू नये? असं भाजपाने सांगितलं.
  • आम्ही राज्यसभेची जागा सोडावी. त्याबदल्यात तुम्ही विधानपरिषदेची जागा सोडणार आहात.
  • त्यापेक्षा तुम्हीच आम्हाला राज्यसभेची जागा सोडल्यास आम्ही तुम्हाला विधान परिषदेची जागा सोडू असं भाजपाने आम्हाला सांगितलं.
  • त्यावर आम्ही म्हटलं राज्यसभेत तुमची भरपूर माणसं आहेत.
  • आमचे कमी आहेत.
  • आमचा एखादा मनुष्य राज्यसभेवर गेला तर बरं होईल. तेवढीच आमची एकाने संख्या वाढेल, असं भुजबळ म्हणाले.

आता चुरशीची लढत

  • भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, विधानसभेत आमच्याकडे ११३ चं संख्याबळ आहे.
  • भाजपा हा राष्ट्रीय पक्ष असल्याने राज्यसभेची जागा लढवणं आमच्यासाठी महत्वाचं आहे.
  • आमच्याकडे आवश्यक पाठिंबा आहे.
  • मविआच्या नेत्यांचाही तसाच दावा आहे.
  • मविआला सभागृहात १७० आमदारांचा पाठिंबा आहे.
  • अंधेरीचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे संख्याबळ एकाने कमी झाले आहे.
  • त्यामुळे मविआकडे आवश्यक संख्याबळ असल्याचा दावा केला जात आहे.

निष्ठा की नोटा?

  • राज्यसभा किंवा विधानपरिषदेच्या निवडणुकीत जेव्हाही अशी अटीतटीची लढत होते, तेव्हा अपक्षांचे भाग्य फळफळते.
  • कारण पक्षाच्या आमदारांना प्रतिनिधीला दाखवूनच मतदान करता येतं, तिथं क्वचितच मते फुटण्याची शक्यता असते.
  • मात्र, अपक्षांसाठी तसं करणं बंधनकारक नसल्यानं ते काहीही करु शकतात.
  • अधिकृत कुणी सांगत नसलं तरीही कोट्यवधीचे व्यवहार होतात, असे बोलले जाते.
  • आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यसभेसाठीच्या व्यवहारांकडे ईडीने लक्ष द्यावे, असं म्हटलं त्याचं कारण तेच.
  • आताही १० जूनला होणाऱ्या मतदानापूर्वी असं बरंच काही घडेल.
  • अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांच्या निष्ठा महत्वाच्या ठरतात की त्यांच्यावर नोटांची मोहिनी पडते, त्यावरही बरच काही अवलंबून आहे.
  • कोट्यात काही फरक झाला तर प्राधान्यक्रमाच्या मतदानाची रणनीतीही महत्वाची ठरु शकेल.

Tags: BJPMaharashtramva governmentRajyasabhaRajyasabha Electionभाजपामहाराष्ट्रमहाविकास आघाडी सरकारराज्यसभेची ६वी जागा
Previous Post

सरकारनं हाती दंडुका घेतला तर १० दिवसात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न सुटेल!- राजू शेट्टी

Next Post

राज्यात ११३४ नवे रुग्ण, ५६३ रुग्ण बरे! मुंबई ७६३, नाशिक १, नागपूर २ नवे रुग्ण !!

Next Post
maharashtra corona report

राज्यात ११३४ नवे रुग्ण, ५६३ रुग्ण बरे! मुंबई ७६३, नाशिक १, नागपूर २ नवे रुग्ण !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!