Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

संजय राऊत म्हणतात तशी त्यांची अटक भाजपाला खरंच महाग पडणार? जाणून घ्या वास्तव…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
what will be the political outcome of sanjay raut bail order

मुक्तपीठ टीम

कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी १०० दिवस तुरुंगात राहिल्यानंतर बुधवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला. यानंतर त्यांची तुरुंगातून सुटका झाली. यावेळी संजय राऊत यांनी समर्थकांना आणि शिवसैनिकांना संबोधित करताना भाजपावर ताशोरे ओढले. आता त्यांना कळेल की, मला अटक करून किती मोठी चूक केली. देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी चूक म्हणजे संजय राऊतांना अटक केली. आता प्रश्न असा आहे की, संजय राऊत म्हणतात तशी त्यांची अटक भाजपाला खरंच महाग पडणार? जाणून घ्या वास्तव…

संजय राऊत त्यांच्या भांडूप येथील घरी आल्यानंतर शिवसैनिकांना संबोधित करताना म्हणाले, आता त्यांना कळेल की, मला अटक करून किती मोठी चूक केली. देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी चूक म्हणजे संजय राऊतांना अटक केली.

संजय राऊतांची विधानं ही सत्ताधारी भाजपाचे लक्ष्य ठरलेल्या एका पीडित विरोधी नेत्याचा संताप म्हणून नजरेआड करता आली असती. पण न्यायालयाने त्यांना जामीन देताना नोंदवलेली निरीक्षणं ही भाजपाच्या भ्रष्ट्राचारविरोधी भूमिकेच्या दाव्याला सुरुंग लावण्यासाठी विरोधक देशभर वापरू शकतात. आजवर सर्वच भाजपाकडून होत असलेल्या पक्षपाती कारवाईच्या आरोपांवर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे.

न्यायालयाने जामीनच दिला नाही ईडीचे वाभाडेच काढले…

  • दिवाणीवादाचे स्वरूप असूनही ‘मनी लॉड्ररिंग’चे नाव दिल्याने तसा गुन्हा दाखल होत नाही. यामुळे निष्पाप लोकांना त्रास होतो.
  • ईडीने प्रवीण राऊत यांना अटक केली आणि संजय राऊत यांना तर कोणतेही कारण नसताना अटक केली.
  • २००६ ते २०१३ या कालावधीतील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात २०१८मध्ये एफआयआर नोंदवल्यापासून म्हाडा पक्षकार आहे आणि म्हाडामधील संबंधित कर्मचाऱ्यांची वर्तणूक संशयास्पद असूनही ईडीने कोणालाही आरोपी केले नाही.
  • मुख्य आरोपी बिल्डर राकेश व सारंग वाधवान यांनी या प्रकरणात आपली चुकीची कृत्ये उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातच मान्य केलेली आहेत. त्यांना अन्य अनेक प्रकरणांत ईडीने अटक केली. मात्र या प्रकरणात मुख्य आरोपी असूनही अटकच केली नाही. यातून ईडीच्या कारवाईतील असमानता सुस्पष्ट दिसते.
  • दिवंगत मुख्यमंत्री विलास देशमुख व तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी या प्रकल्पासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेतली, असे ईडीकडे जबाब नोंदवणाऱ्या चंदन केळेकर यांना विशिष्ट गोष्टी ‘फोटोग्राफिक मेमरी’प्रमाणे आठवल्या; पण इतर अनेक बाबी आठवल्या नाहीत.
  • जर न्यायालयानं प्रवीण आणि संजय राऊतांचा जामीन नाकारला तर प्रामाणिक आणि निष्पाप लोकांचा न्यायालयावरचा विश्वासच उडेल. त्यामुळं न्यायालयाच्या मते दोन्ही आरोपींना झालेली अटक ही बेकायदा आहे.

मुक्तपीठ विश्लेषण

एकूणच भाजपा नेते मोहित कंबोज यांनी आता पुन्हा मैदानात उतरावे लागेल, असं म्हटलं असलं तरी ते आता तेवढेसे सोपे नसणार. आदित्य ठाकरे म्हणाले तसं, आता शिवसेनेची तोफ मैदानात परतली आहे! अर्थात याचा अर्थ भाजपाविरोधी नेत्यांविरोधात आता केंद्रीय यंत्रणा राजकीय कारणांमुळे कारवाई करणार नाहीत, असंही नाही.


Tags: BJPPatrachawl ScamPMLA Courtsanjay rautपत्राचाळ घोटाळा प्रकरणपीएमएलए न्यायालयभाजपासंजय राऊत
Previous Post

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये ट्रेड अॅप्रेंटिसशिपसाठी १ हजार २१६ जागांसाठी संधी

Next Post

बच्चू कडूंचं स्वप्न साकारणार, राज्यात लवकरच स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग!

Next Post
मा मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत दिव्यांगाबाबत बैठक 1

बच्चू कडूंचं स्वप्न साकारणार, राज्यात लवकरच स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!