मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेने कहर केला आहे. राज्यातील अनेक जिल्हांमध्ये उष्णतेचा पारा वर चढला असून येत्या २ एप्रिलपर्यंत ही लाट काय राहणार आहे, असा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नागरिकांनी काळजी घेण्यासाठी सूचना केल्या आहेत.
सावधान! आली उष्णतेची लाट…
- मुंबईत तापमानाचा पारा कमी असला तरी उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत.
- जळगाव, नाशिक जिल्ह्यात ३० मार्च, १ आणि २ एप्रिल रोजी उष्णतेची लाट तीव्र असेल.
- तर, नगर, औरंगाबाद, जालना, हिंगोली आणि अकोला या जिल्ह्यात ३० व ३१ मार्च आणि १, २ एप्रिल अमरावती, बुलडाणा, ३० आणि ३१ मार्च, चंद्रपूर जिल्ह्यात ३१ मार्च तर, नागपूर जिल्ह्यात ३० मार्च रोजी उष्णतेची लाट सर्वाधिक
- सक्रीय असेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
‘हे’ करा, ‘हे’ टाळा…करा मात!!
- ‘हे’ करा…
- शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखा.
- डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्री वापरावी.
- छेट येणाऱ्या सूर्यप्रकाशाला/ उन्हाला अडवावे.
- दुपारी १२ ते ४ या वेळात घरात राहावे.
‘हे’ टाळा…
- दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर जाऊ नये.
- उन्हात शारीरिक परिश्रम होणाऱ्या कृती टाळाव्यात.
- दुपारी २ ते ४ या वेळात स्वयंपाक करणे टाळावे.
- लहान मुलांना आणि पाळीव प्राण्यांना आत ठेवून गाडीत बंद करू नये.
- चप्पल न घालता अनवाणई उन्हात चालू नये.
- मद्य, चहा, कॉफी, खूप साखर असलेली आणि कार्बोनेट द्रव्याचे सेवन टाळावे.