मुक्तपीठ टीम
गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र रंगल्यात त्या रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाच्या चर्चा. नेमक्या आजच्या लग्नाच्या दिवशीच त्यांच्या लग्नाच्या गेस्ट लिस्ट लिक केल्याचा दावा आम आदमी पार्टीने केला आहे. आपची ती गेस्ट लिस्ट लीक करणारी इंस्टाग्राम पोस्ट सध्या चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे. कारण ती लिक करण्याचा दावा करत आपनं राजकारण तापवणारा डाव खेळलाय.
View this post on Instagram
सेलिब्रिटींच्या लग्नाविषयी सामान्यांमध्ये असलेल्या उत्सुकतेचा राजकारणासाठी कसा फायदा करुन घेता येतो ते आम आदमी पक्षाने दाखवून दिलं आहे. सध्या आम आदमी पक्षाची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत आहे. रणबीर आणि आलियाच्या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांची फुटलेली लिस्ट अशा कॅप्शनसह ‘आप’च्या इन्स्टा हँडलवरून एक लिंक शेअर करण्यात आली आहे. मात्र, ही लिंक ओपन केल्यानंतर मुंबई मनपातील एकेका घोटाळ्याची माहिती देण्यात आली आहे. इन्स्टा पोस्टच्या माध्यमातून ‘आप’ने शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
काय आहे नेमकं या इ्न्स्टा पोस्टमध्ये?
- आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नात कोण-कोण पाहुणे येणार, हे पाहण्याच्या उत्सुकतेने अनेकांनी इ्न्स्टा लिंकवर क्लिक केले.
- ही लिंक ओपन केल्यानंतर त्याठिकाणी पाहुण्यांची यादी पाहण्यासाठी उजवीकडे स्वाईप करा, असे लिहले आहे.
- मात्र, उजवीकडे स्वाईप केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो दिसत आहे.
- त्या फोटोवर मुंबई महानगरपालिकेकडून मिठी नदीच्या सफाई झालेल्या घोटाळ्याचा आकडा लिहलेला आहे.
- या स्लाईड जसजशा पुढे जातात, त्यामध्ये मुंबई मनपातील एकेका घोटाळ्याची माहिती देण्यात आली आहे.
- ही पोस्ट इन्स्टाग्रामवर चांगलीच व्हायरल झाली आहे.
रणबीर-आलियाचं आज लग्न
- गुरुवारी रणबीर आणि आलिया हे दोघे वांद्रे येथील ‘वास्तू’ अपार्टमेंटमध्ये पारंपरिक पद्धतीने विवाहबद्ध होणार आहे.
- या विवाह सोहळ्याला केवळ ५० लोक उपस्थित राहणार आहेत.
- यामध्ये रणबीर आणि आलियाच्या नातेवाईकांचा समावेश असल्याचे सांगितले जाते.
- त्यानंतर शनिवारी किंवा रविवारी रणबीर-आलियाच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा असेल.
- मात्र, रिसेप्शन सोहळ्याचे स्थळ अद्याप निश्चित झालेले नाही.
- हा रिसेप्शन सोहळा चेंबूरमधील आरके बंगला किंवा पाली हिल येथील रणबीरच्या ‘वास्तू’ या निवासस्थानीच पार पडण्याची शक्यता आहे.