Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सातारा जिल्ह्यातील महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प एक मेपासून राज्यभर राबवणार! – शंभूराज देसाई

April 14, 2022
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या, सरकारी बातम्या
0
Satara Women safety pilot project to implement all over state from 1 may

मुक्तपीठ टीम

शालेय व महाविद्यालयीन मुलींच्या स्वसंरक्षणासाठी सातारा जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यात आलेला महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प १ मे पासून संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पाचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात हा प्रकल्प राबविण्याची घोषणा अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली होती. १ मे रोजी प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पालकमंत्री यांच्या हस्ते या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

 

महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प राज्यात राबविण्याबाबत गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबरोबर मंत्रालयातून व्हिसीद्वारे संवाद साधला. यावेळी शंभूराज देसाई बोलत होते. यावेळी गृह विभागाचे प्रधान सचिव संजय सक्सेना, विशेष पोलीस महानिरीक्षक (ट्रेनिंग) रविंद्र सेनगांवकर, कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर, औरंगाबादचे विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम.एम प्रसन्ना, नांदेडचे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, नागपूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. चेरींग दोरजे, अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मिणा, गडचिरोलीचे पोलीस उपमहानिरीक्षक संदिप पाटील यांच्यासह साता-याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे उपस्थित होते.

 

महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प राज्यात राबविताना शासनाच्या विविध विभागांचा सहभाग घ्यावा, असे सांगून शंभूराज देसाई म्हणाले, राज्यातील प्रत्येक शाळेपर्यंत हा प्रकल्प पोहचवावा. शाळेमधील मुलींना त्यांच्यासाठी असणाऱ्या कायद्यांची माहिती देवून स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण द्यावे. त्यांच्यात आपले स्वसंरक्षण स्वत: करु शकू असा आत्मविश्वास निर्माण करावा. जिल्ह्यामध्ये महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प राबविताना आराखडा तयार करावा. विविध विभागांचा सहभाग घेवून या प्रकल्पाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. या प्रकल्पात जास्तीत जास्त शालेय, महाविद्यालयीन मुलींचा सहभाग घ्यावा, असे निर्देशही गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

 

साता-याचे पोलीस अधीक्षक श्री. बन्सल म्हणाले, सातारा जिल्ह्यात महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प हा गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. एका कार्यक्रमामध्ये एका मुलीला महिला पथदर्शी प्रकल्पाचा अनुभव विचारण्यात आला. पोलीस विभागाच्या हा पथदर्शी प्रकल्प अतिशय स्तुत्य आहे. महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पांतर्गत आम्हाला स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले त्यामुळे आमच्यात आत्मविश्वास वाढला आहे. छेड काढणाऱ्याला तेथेच धडा शिकवू असा आमच्यात आत्मविश्वास असल्याचेही या मुलीने सांगितले. महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पामुळे मुलींचा आत्मविश्वास कमालीचा वाढला असल्याचे श्री. बन्सल यांनी सांगून जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या या प्रकल्पाबाबत माहिती दिली.


Tags: satarashambhuraj desaiWomen safety pilot projectwomensमहिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पशंभूराज देसाईसातारा
Previous Post

लेनच्या पुस्तकावर बंदी मागणीच्या पत्रावर पुरंदरेंचीही सही! पवारांना कसं माहित नाही? – संदिप देशपांडे

Next Post

‘आप’चा ताप: ‘रणवीर-आलिया’ लग्नाच्या गेस्ट लिस्ट लीकच्या मागे कोणतं राजकारण?

Next Post
Alia Bhat Ranbir Kapoor

'आप'चा ताप: 'रणवीर-आलिया' लग्नाच्या गेस्ट लिस्ट लीकच्या मागे कोणतं राजकारण?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!