मुक्तपीठ टीम
२०२२ संपायला काही दिवस उरलेत. प्रत्येकजण येत्या वर्षाच्या स्वागताच्या तयारीत व्यस्त आहे. परंतू नविन वर्षात काही नवीन बदल होणार आहेत आणि त्याला सामोरे जावे लागेल. याचा थेट परिणाम जनतेच्या खिशावर होऊ शकतो. १ जानेवारी २०२३ पासून काही महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. हे बदल क्रेडिट कार्ड, बँक लॉकर, जीएसटी ई-इनव्हॉइसिंग, सीएनजी-पीएनजी किमती आणि वाहनांच्या किमतींशी संबंधित नियमांमध्ये आहेत. ते नेमके जनतेच्या खिशाला कसे परिणाम करतील ते जाणून घेवूया…
ई-इनव्हॉइसिंगशी संबंधित जीएसटी नियम बदलणार
- नविन वर्षात जीएसटी ई-इनव्हॉइसिंग आणि इलेक्ट्रॉनिक बिलाशी संबंधित नियमांमध्येही बदल दिसून येतील.
- जीएसटी ई-इनव्हॉईसिंगसाठी थ्रेशोल्ड २० कोटींवरून ५ कोटी रुपये करण्यात आला आहे.
- नियमांमधील हे बदल १ जानेवारी २०२३ पासून लागू होणार आहेत.
बँक लॉकर नियमांमध्ये बदल
- बँक लॉकरशी संबंधित नवीन सूचना आरबीआयने जारी केल्या आहेत.
- हे नियम १ जानेवारी २०२३ पासून लागू होतील.
- बँकांना यापुढे ग्राहकांशी मनमानी करता येणार नाही.
- नवीन नियमांनुसार बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंचे काही नुकसान झाल्यास त्यासाठी बँकेची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे.
- यासाठी बँक आणि ग्राहक यांच्यात करार करण्यात येणार असून, तो ३१ डिसेंबरपर्यंत वैध असेल.
क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल
- १ जानेवारी २०२३ पासून क्रेडिट कार्ड युजर्ससाठीही नवीन नियम लागू होणार.
- क्रेडिट कार्ड पेमेंटवर मिळवलेल्या रिवॉर्ड पॉइंटशी संबंधित हा नियम असेल.
- नवीन वर्षात एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड पेमेंटवर उपलब्ध रिवॉर्ड पॉइंट्स बदलणार आहे.
- क्रेडिट कार्डमधील उर्वरित सर्व रिवॉर्ड पॉइंट ३१ डिसेंबर २०२२ पूर्वी भरावे लागणार.
सीएनजी-पीएनजीच्या किमतीही बदल
- स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या किमतीतही बदल होणार आहेत.
- दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम आणि फरीदाबाद या भागात सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.
- त्यामुळे त्याचे परिणाम देशभरात होतील.
वाहनांच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता
- २०२३ मध्ये वाहने महाग होण्याची शक्यता आहे.
- MG Motor, Maruti Suzuki, Hyundai Motors, Honda, Tata Motors, Renault, Audi आणि Mercedes-Benz सारख्या अनेक कंपन्यांनी किमतीत वाढ जाहीर केली आहे.
- टाटा मोटर्सने २ जानेवारी २०२३ पासून व्यावसायिक वाहनांच्या किमती वाढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
- होंडा कंपनीने वाहनांच्या किमती ३०,००० रुपयांपर्यंत वाढू शकतात.