Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ठाकरेंचे शिवसैनिक आणि खा. भावना गवळी आमने-सामने! तेव्हा नेमकं काय घडलं?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Bhavna Gawli At Akola Station

मुक्तपीठ टीम

शिवसेनेतील बंडखोरीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचं खोकेकरण झाल्याची टीका होत असते. अकोला रेल्वे स्थानकावर जे काही घडलं ते शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदार, खासदारांसाठी धोक्याचा इशारा देणारंच आहे. खोके-ओकेपासून गद्दारपर्यंतच्या घोषणांनी अकोला स्थानक दणाणून गेलं…तेही शिंदे गटात गेलेल्या खासदार भावना गवळींसमोरच…

शिवसेना सचिव विनायक राऊत अकोला दौऱ्यावर होते. तेथून ते परतताना त्यांना निरोप देण्यासाठी अकोला रेल्वे स्थानकात शिवसैनिकांनी गर्दी केली होती. तेवढ्यात तिच गाडी पकडण्यासाठी खासदार भावना गवळी तेथे आल्या आणि मग ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी भावना गवळी दिसताच गद्दार गद्दार अशी घोषणाबाजी सुरू केल्यात.

नेमकं काय घडलं?

  • विदर्भ एक्सप्रेसने अकोला रेल्वे स्थानकावर बाळासाहेबांची शिवसेनेच्या खासदार भावना गवळी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत आमने-सामने आले.
  • यावेळी भावना गवळी दिसताच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून गद्दार गद्दार तसेच ५० खोके एकदम ओके अशा घोषणा करण्यात आल्या.
  • यादरम्यान अकोला रेल्वे स्थानकावर एकच गोंधळ पाहायला मिळाला.
  • यावेळी शिवसेना आमदार नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, शिवसेना महानगर अध्यक्ष राजेश मिश्रा, युवा सेनेचे पदाधिकारी राहुल कराळेसह आदी शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

असं पहिल्यांदाच घडलं असं नाही. रायगडमधील महाडमध्ये आदित्य ठाकरे गेले असताना त्यांनी तुमचे आमदार कोण, असा प्रश्न विचारला, तेव्हा उपस्थितांनी आमदार भरत गोगावलेंचं नाव न घेता काय म्हटलं ते मुक्तपीठनं याआधीच दाखवलेल.

सत्ता हेच सत्य नसतं हेच अकोल्यातील घटनेतून दिसून आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाशक्ती म्हणाले, त्या भाजपाच्या आश्रयाला गेले, महाराष्ट्रात सत्तेत आहेत, तरीही शिंदे गटाच्या आमदार, खासदारांना जनप्रक्षोभाचा सामना करावा लागतोय. पण त्याच वेळी ठाकरेंच्या शिवसेनेनेही फक्त घोषणाबाजीलाच बहादुरी न समजता सामान्यांसाठी सामाजिक कार्यावर भर द्यावा लागेल, नाही तर घोषणांच्या वाफा संपल्यावर पुढे काय, असा प्रश्न पडेल.


Tags: akolaBhavna GawliShivsensaVinayak Rautभावना गवळीशिवसैनिक
Previous Post

स्थलांतरामुळे बाधित मुलांच्या संरक्षणाबाबतच्या अहवालाचे प्रकाशन

Next Post

ठाकरेंचे शिवसैनिक आणि खा. भावना गवळी आमने-सामने! तेव्हा नेमकं काय घडलं?

Next Post
ठाकरेंचे शिवसैनिक आणि खा. भावना गवळी आमने-सामने! तेव्हा नेमकं काय घडलं?

ठाकरेंचे शिवसैनिक आणि खा. भावना गवळी आमने-सामने! तेव्हा नेमकं काय घडलं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!