मुक्तपीठ टीम
देशभरात सायबर फसवणुकीच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातही हनी ट्रॅपचे गुन्हे वाढत चालले आहेत. ऑनलाइन व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून तरुण किंवा मध्यमवयीन पुरुषांना लक्ष्य करत ब्लॅकमेल करण्याचे गुन्हे वाढत आहेत. यात मोठमोठ्या टोळी लोकांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळवले जातात. या हनी ट्रॅपमध्ये सामान्य लोकांपासून बडे नेते, आमदार, सेलिब्रिटी आणि बिझनेसमन बळी पडतात. दरम्यान अनेकांना जाळ्यात अडकवणारा हनी ट्रॅप नेमका असतो तरी काय? हे जाणून घेऊया…
हनी ट्रॅप म्हणजे काय?
- एखाद्या पुरुष सावजाला जाळ्यात ओढण्यासाठी सुंदर स्त्रीचा आमिषासारखा वापर केला जातो, त्याला हनी ट्रॅप म्हणतात.
- हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या अधिकारी, प्रभावशाली, श्रीमंत पुरुषांना सदर महिलेकडून गोडीगुलाबीने चलाखीने माहितीसाठी वापरून घेतले जाते
- काहीवेळा पुरुष सहकार्य करत नाहीत तेव्हा मात्र हनी ट्रॅप कटानुसार घडवलेल्या संबंधांचे व्हिडीओ ब्लॅकमेल करण्यासाठी वापरले जातात. इप्सित साध्य केले जाते.
- जागतिक पातळीवर लष्करी हेरगिरी, कॉर्पोरेट हेरगिरी, राजकीय हेरगिरी यात हनी ट्रॅपचा शस्त्रासारखा वापर केला जातो.
- भारतातही राजकीय नेत्यांचे करिअर संपवण्यासाठी किंवा निवडणुकीच्या तोंडावर अपप्रचार करण्यासाठी हनी ट्रॅपचा वापर करतात.
धोका कसा टाळाल?
- सर्वात चांगला मार्ग म्हणजे सेक्सशी संबंधित अशा ऑनलाइन आमिषांना टाळा.
- अनेकदा भावना अनावर होतात, असे कारण सांगितले जाते. अगदीच अपरिहार्य असेल तर त्यासाठी इतर सुरक्षित पॉर्न वेबसाइटवर ते पाहा.
- खरंतर कोणत्याही अशा वेबसाइटवर ऑनलाइन पेमेंट करून ते पाहणे धोकादायकच.
- त्यातून ज्यांचं अस्तित्व तुम्हाला माहित नाही त्यांच्याकडे तुम्ही क्रेडिट कार्ड, बँक अकाऊंट अन्य गोपनीय ठेवावी ती माहिती उघड करत असता.
- लाइव्ह सेक्स व्हिडीओ कॉलमध्ये सहभागी होण्याचा मोह टाळाच टाळा.
- अशा आमिषांच्या माध्यमातून सावजाच्या भावना अधिक चाळवून मग त्याला कपडे काढायला लावायचे आणि ती रेकॉर्डेड क्लिप ब्लॅकमेलिंगसाठी वापरायची असा कट असतो, हे भावना कितीही अनावर झाल्या तरी विसरू नका.
- तुमच्या डिव्हाइसवर अँटीव्हायरस कायम सक्रिय ठेवा. अशा वेबसाइटबद्दल तेही सावध करतील. रोखतील.
- मोह टाळणं, पॉर्न पाहतानाही मर्यादा पाळणे हेच धोका टाळण्याचे उपाय आहेत.