Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

काँग्रेस अध्यक्षपद: राहुल गांधींची फेसबुक पोस्ट काय सांगते?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
rahul gandhi

मुक्तपीठ टीम

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारावे अशी काँग्रेसमधील अनेकांची इच्छा आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत काँग्रेसमधील दोन चेहऱ्यांची सर्वाधिक चर्चा आहे. एक राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि दुसरे खासदार शशी थरूर. अशातच राहुल गांधींची फेसबुक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. त्यांच्या फेसबुक पोस्टवरून असा अंदाज बांधला जात आहे की, राहुल गांधी हेच काँग्रेसचे पुढचे अध्यक्ष होणार आहेत. मात्र राहुल गांधी यांनी आपण काँग्रेस अध्यक्ष निवडणुकीच्या शर्यतीत नसल्याचे या आधीच स्पष्ट केले आहे.

राहुल गांधी यांची फेसबुक पोस्ट-

  • राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेवर आहेत.
  • त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली.
  • ज्यात ते बोटिंग करताना दिसत आहेत.
  • राहुल गांधी यांनी हातात सुकाणू धरलेले दिसत आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, जेव्हा बोट मध्येच अडकते, तेव्हा सुकाणू हातात घ्यावा लागतो.
  • त्यांनी पुढे लिहिले, थांबणार नाही, झुकणार नाही. भारत जोडणार.
  • त्यांच्या या पोस्टमुळे राहुल गांधी नवे अध्यक्ष होणार का? या चर्चा रंगू लागल्या आहेत.
  • मात्र, राहुल गांधी यांनी आपण काँग्रेस अध्यक्षपद स्वीकारणार नाही असे आधीच स्पष्ट केले आहे.
  • राहुल गांधी म्हणाले की, देशातील सर्वात जुन्या पक्षाचे प्रमुख पद हे वैचारिक आहे आणि जो कोणी ही जबाबदारी स्वीकारेल त्याने लक्षात ठेवावे की ते भारताच्या व्हिजनचे प्रतिनिधित्व करतील.
  • अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्ष हा गांधी कुटुंबातील असणार असं सांगितले आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना जारी

  • २२ वर्षांनंतर काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढण्याची दाट शक्यता असताना गुरुवारी अधिसूचना जारी करण्यात आली आणि त्यासोबतच निवडणूक प्रक्रिया सुरू झाली.
  • काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या जाहीर कार्यक्रमानुसार अधिसूचना जारी झाल्यानंतर आता २४ ते ३० सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आहे.
  • उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ८ ऑक्टोबर आहे.
  • एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास १७ ऑक्टोबरला मतदान होईल आणि १९ ऑक्टोबरला निकाल जाहीर केला जाईल.

Tags: CongressCongress President Electionrahul gandhiकाँग्रेसकाँग्रेस अध्यक्षराहुल गांधी
Previous Post

रंग बदलणारा स्मार्ट फोन!

Next Post

राज्यास १ कोटी, ४९ लाख क्विंटल धान व ६१,०७५ क्विंटल भरडधान्य खरेदीस केंद्राची परवानगी – रवींद्र चव्हाण

Next Post
धान खरेदीबाबत हंगाम पूर्व बैठक 2

राज्यास १ कोटी, ४९ लाख क्विंटल धान व ६१,०७५ क्विंटल भरडधान्य खरेदीस केंद्राची परवानगी - रवींद्र चव्हाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!