Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यास १ कोटी, ४९ लाख क्विंटल धान व ६१,०७५ क्विंटल भरडधान्य खरेदीस केंद्राची परवानगी – रवींद्र चव्हाण

September 23, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
धान खरेदीबाबत हंगाम पूर्व बैठक 2

मुक्तपीठ टीम

राज्य शासनाने केंद्र सरकारकडे सादर केलेल्या धान व भरडधान्य खरेदीच्या आराखड्यास केंद्राने मान्यता दिली असून, राज्यास १ कोटी, ४९ लाख क्विंटल धान व ६१,०७५ क्विंटल भरडधान्य खरेदीस परवानगी दिल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. खरीप पणन हंगाम २०२२ – २३ मध्ये धान व भरडधान्य खरेदी संदर्भात मंत्रालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी विभागाचे सचिव विजय वाघमारे, मार्केट फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक सुधाकर फेले, पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके, सहसचिव सुधीर तुंगार, उपायुक्त पुरवठा व सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी उपस्थित होते.            

मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या धान व भरडधान्यांचे चुकारे कोणत्याही परिस्थितीत विहीत वेळेत अदा करावेत. क्षेत्रीय अधिकारी यांनी जनजागृती करून शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येवू नये याची खबरदारी घ्यावी, खरीप पणन हंगाम २०२२ – २३ मध्ये धान व भरडधान्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन धान खरेदी पोर्टलवर नोंदणी सुरु करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. धान खरेदी केंद्रांवर उपलब्ध करुन द्यावयाच्या पायाभूत सुविधांबाबत खबरदारी घ्यावी. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचाही अवलंब करण्यात यावा. कृषी विभागामार्फत धान व भरडधान्य यांचे लागवड क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता याबाबतची अद्ययावत माहिती उपलब्ध करुन  घेण्यात यावी. पणन हंगाम २०२२ – २३ मध्ये खरेदी होणाऱ्या धान व भरडधान्य साठवणूकीसाठी गोदामांचे तसेच गुणवत्ता नियंत्रणाचे व्यवस्थापन करण्यात येवून धान व भरडधान्य खरेदीकरिता बारदाना खरेदी व पुरवठा याबाबतचे व्यवस्थापन याबाबत विभागाने काटेकोरपणे कार्यवाही करावी, असे निर्देशही मंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी दिले.            

केंद्र सरकारने खरीप पणन हंगाम २०२२ – २३ करीता जाहीर केलेल्या आधारभूत किंमती पुढीलप्रमाणे. धान साधारण दर्जा २०४० रु. प्रति क्विंटल तर अ दर्जाच्या धानाकरीता २०६० रु. रक्कम निर्धारित करण्यात आली आहे. संकरित ज्वारीसाठी २९७० रु. तर मालदांडीसाठी २९९० रु. रक्कम निर्धारित करण्यात आली आहे. बाजरी २३५०, रागी ३५७८, मका १९६२ रु. अशा किंमती निर्धारित करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.


Tags: MaharashtraPaddy Coarse GrainPublic Works Minister Ravindra Chavanधानभरडधान्यमहाराष्ट्ररवींद्र चव्हाण
Previous Post

काँग्रेस अध्यक्षपद: राहुल गांधींची फेसबुक पोस्ट काय सांगते?

Next Post

जेएसडब्लू कोकणात करणार ४२०० कोटींची गुंतवणूक – उद्योगमंत्री उदय सामंत

Next Post
जेएसडब्लू सोबत उद्योग विभाग लवकरच करणार सामंजस्य करार 2

जेएसडब्लू कोकणात करणार ४२०० कोटींची गुंतवणूक - उद्योगमंत्री उदय सामंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!