मुक्तपीठ टीम
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारावे अशी काँग्रेसमधील अनेकांची इच्छा आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत काँग्रेसमधील दोन चेहऱ्यांची सर्वाधिक चर्चा आहे. एक राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि दुसरे खासदार शशी थरूर. अशातच राहुल गांधींची फेसबुक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. त्यांच्या फेसबुक पोस्टवरून असा अंदाज बांधला जात आहे की, राहुल गांधी हेच काँग्रेसचे पुढचे अध्यक्ष होणार आहेत. मात्र राहुल गांधी यांनी आपण काँग्रेस अध्यक्ष निवडणुकीच्या शर्यतीत नसल्याचे या आधीच स्पष्ट केले आहे.
राहुल गांधी यांची फेसबुक पोस्ट-
- राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेवर आहेत.
- त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली.
- ज्यात ते बोटिंग करताना दिसत आहेत.
- राहुल गांधी यांनी हातात सुकाणू धरलेले दिसत आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, जेव्हा बोट मध्येच अडकते, तेव्हा सुकाणू हातात घ्यावा लागतो.
- त्यांनी पुढे लिहिले, थांबणार नाही, झुकणार नाही. भारत जोडणार.
- त्यांच्या या पोस्टमुळे राहुल गांधी नवे अध्यक्ष होणार का? या चर्चा रंगू लागल्या आहेत.
- मात्र, राहुल गांधी यांनी आपण काँग्रेस अध्यक्षपद स्वीकारणार नाही असे आधीच स्पष्ट केले आहे.
- राहुल गांधी म्हणाले की, देशातील सर्वात जुन्या पक्षाचे प्रमुख पद हे वैचारिक आहे आणि जो कोणी ही जबाबदारी स्वीकारेल त्याने लक्षात ठेवावे की ते भारताच्या व्हिजनचे प्रतिनिधित्व करतील.
- अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्ष हा गांधी कुटुंबातील असणार असं सांगितले आहे.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना जारी
- २२ वर्षांनंतर काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढण्याची दाट शक्यता असताना गुरुवारी अधिसूचना जारी करण्यात आली आणि त्यासोबतच निवडणूक प्रक्रिया सुरू झाली.
- काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या जाहीर कार्यक्रमानुसार अधिसूचना जारी झाल्यानंतर आता २४ ते ३० सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आहे.
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ८ ऑक्टोबर आहे.
- एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास १७ ऑक्टोबरला मतदान होईल आणि १९ ऑक्टोबरला निकाल जाहीर केला जाईल.