मुक्तपीठ टीम
देशातीलच नाही तर जगभरातील अनेक ठिकाणी आकाशात ट्रेनसारख्या प्रकाशरेषा दिसल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये येत आहेत. समाजमाध्यमांमध्ये तसे व्हिडीओही व्हायरल होत आहेत. दिवाळी असल्याने फटाक्यांवरही संशय गेला. परंतु हे दिवाळीच्या रॉकेट किंवा फटाक्यांमुळे दिसले असे नाही त्यामागचे कारण ही वेगळंच आहे, चला जाणून घेवुया काय आहे कारण?
गेल्या काही दिवसांत लोकांनी आकाशात एक रहस्यमय दृश्य पाहिले आहे. देशभरात अनेक ठिकाणी रात्रीच्या अंधारात आकाशात एका सरळ रेषेत लांबलचक रांग लोकांना दिसली. ते बघून जणू एखादी ट्रेन आकाशात उडतेय असे वाटले.
Saw this unidentified object in the night sky pic.twitter.com/mpq3qw1Uyr
— Raj Lakshmi Yadav راج لکشمی (@Rajlakshmiyadav) September 12, 2022
उडणाऱ्या ट्रेनसारख्या प्रकाशरेषेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल…
- आकाशात उडणाऱ्या ट्रेनसारख्या या विचित्र प्रकाशाबद्दल विविध अंदाज बांधले जात आहे.
- हा विचित्र प्रकाश काही काळ दिसल्यानंतर आकाशातून गायब होतो.
- अनेकांनी त्याचे फोटो आणि व्हिडिओ बनवले आणि ते त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले.
- हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
- काहींनी त्याला एलियन यूएफओ म्हणायला सुरुवात केली तर काहींनी फ्लाइंग सॉसर म्हणायला सुरुवात केली आहे.
- हे स्पष्ट झाले की हा विचित्र प्रकाश नसून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती व टेस्ला आणि ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांच्या स्टारलिंक उपग्रहाचा परिणाम होता.
या प्रकाशाचे रहस्य काय आहे?
- या वर्षाच्या सुरुवातीला पंजाबमध्येही असा प्रकाश दिसला होता.
- जम्मू पोलिसांनी याला स्टारलिंक उपग्रहाचा प्रकाश म्हणून वर्णन केले होते.
- आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांच्या रिपोर्ट्समध्येही, हे छायाचित्रे स्टारलिंक सॅटेलाइट असल्याचे सांगण्यात आले आहे.
- इतरही काही ठिकाणी असा प्रकाश दिसेल अशी माहिती देण्यात आली आहे.
- स्टारलिंक ही एलोन मस्कची कंपनी आहे.
- जगभरात सॅटेलाइटद्वारे इंटरनेट सुविधा पुरवते.
- या कामासाठी त्यांनी अनेक उपग्रह अवकाशात पाठवले आहेत.
- भविष्यात आणखी अनेक उपग्रह पाठवणार आहेत.