मुक्तपीठ टीम
गेल्या काही महिन्यांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरुच आहे. या दोन्ही देशांतील संघर्ष संपण्याचं चिन्हं दिसत नाही. रशियाने युक्रेनवर अनेक क्षेपणास्त्रं डागल्याने युक्रेनमध्ये मोठं नुकसान झालं आहे. आता रशियाने इराणकडून घातक कामीकाझे ड्रोन विकत घेतल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपासून रशिया युक्रेनच्या शहरांवर कामीकाझे ड्रोनने हल्ले करत आहे, ज्यामुळे युक्रेनची राजधानी किवमध्ये मोठे नुकसान झाले आहे.
हे इराणी ड्रोन आहे तरी कसे?
- इराणमध्ये बनवलेले हे ‘कामिकाझे ड्रोन’ रशियासाठी अतिशय प्रभावी ठरत आहेत.
- आतापर्यंत रशियाने युक्रेनवर क्षेपणास्त्राद्वारेच हल्ला केला होता, जो फारसा यशस्वी झाला नव्हता.
- पण आता या ड्रोनच्या माध्यमातून रशिया युक्रेनला उद्ध्वस्त करत आहे.
- या ड्रोनला आत्मघाती ड्रोन असेही म्हटले जाते, कारण ते मोठ्या प्रमाणात स्फोटके वाहून नेतात आणि लक्ष्याजवळ आल्यावर त्यांचा स्फोट होतो.
- यामुळे शत्रूचे मोठे नुकसान होते.
- या माध्यमातून रशियाने आता युक्रेनची शहरी केंद्रे, पायाभूत सुविधा आणि वीज केंद्रांवरही हल्ला केला आहे.
या ड्रोनची २ हजार किमी पर्यत उड्डाण क्षमता!!
- हे ड्रोन क्रूझ क्षेपणास्त्रांपेक्षा अधिक प्राणघातक ठरत असल्याचे संरक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
- ते लक्ष्यावर घिरट्या घालतात आणि नंतर वेगाने खाली येत स्फोट होतात.
- ए शेपमध्ये बनवलेले हे ड्रोन वेगाने उडतात.
- हे आत्मघाती ड्रोन २ हजार किमी पर्यंत उड्डाण करू शकतात.
- रशिया आता या ड्रोनद्वारे राजधानी कीवसह अनेक शहरांवर हल्ले करत आहे.