मुक्तपीठ टीम
एनकाऊंटर स्पेशलिस्ट प्रदिप शर्मा हा बरीच वर्षे अंबानी स्फोटके प्रकरणातील आरोपी सचिन वाझेचे बॉस होता. मात्र, स्फोटके प्रकरणात सचिन वाझेने आपल्या जुन्या बॉसलाच एक साक्षीदार मनसुख हिरेनला संपवण्याची सुपारी देण्याचा आरोप एनआयएने केला आहे. त्यासाठी सचिन वाझेने पाचशेच्या नोटांनी भरलेली बॅगही शर्मांकडे सोपवली होती. त्यानुसार शर्मांनी हत्या घडवली असा आरोप एनआयएच्या आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे.
सचिन वाझेने शर्माला दिली मनसुख हत्येची सुपारी
- उद्योगपती अंबानी स्फोटके कटातील पुरावा नष्ट करण्यासाठी मनसुख हिरेनच्या हत्येचा कट रचण्यात आला.
- हिरेन मनसुख हत्येची सुपारी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला देण्यात आली होती.
- सचिन वाझे प्रदीप शर्माच्या पीएस फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यालयात गेला.
- तेथे त्याने शर्माला पाचशे रुपयांच्या नोटांनी भरलेली बॅग दिली.
प्रदिप शर्मांनी मनसुख हिरेनची हत्या घडवल्याचा आरोप
- एनआयएने आपल्या आरोपपत्रात धक्कादायक आरोप केले आहेत.
- हिरेन मनसुखचा ४ मार्च रोजी खून झाला.
- एनआयएच्या आरोपांनुसार, मनसुखच्या हत्येचे काम मिळाल्यानंतर प्रदीप शर्माने या प्रकरणातील आरोपी संतोष शेलारला काम सोपवले.
- या हत्येचा कट रचण्यासाठी सचिन वाझे इतर आरोपींना २ मार्च रोजी त्याच्या CIU च्या कार्यालयात भेटला.
- तेथे प्रदीप शर्मा आणि गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील माने यांची चर्चा झाली.
- वाझेने मनसुखची चेहरेपट्टी करण्यासाठी त्यालाही तेथे बोलवले होते
- त्याच दिवशी संध्याकाळी सचिन वाझे पुन्हा एकदा अंधेरीतील चकाल्यात सुनील मानेला भेटला.
- त्याने मानेला बुकी नरेश गौर यांनी दिलेले सिम कार्ड आणि मोबाईल हँडसेट दिले.
मनसुखच्या हत्येपूर्वी सखोल नियोजन
- दुसरीकडे प्रदीप शर्मा यांनी संवेष शेलार यांच्याकडून तवेरा वाहनाचा नोंदणी क्रमांक मागितला, जो मनसुख हत्येसाठी वापरला जाणार होता.
- सुनील मानेला सचिन वाझेने दिलेल्या सिमकार्डमध्ये काही समस्या होती, त्यामुळे सुनील माने ३ मार्च रोजी सचिन वाजे यांच्या कार्यालयात गेले आणि त्यांनी त्यांना दिलेल्या सिम आणि मोबाईल फोन परत केला.
- त्यावर वाझेने त्याच दिवशी पुन्हा मानेला एक नवीन मोबाईल आणि सिम दिले.
- त्या सिमने मनसुखला फोन करा आणि त्याला ठाण्यात फोन करा.
- तेथे मनसुखला संतोष शेलारसह त्या कॉन्ट्रॅक्ट किलर्सच्या स्वाधीन केले जाईल, ज्यांच्यावर प्रदीप शर्मा यांनी मनसुखच्या हत्येची जबाबदारी सोपवली होती, असे ठरले.
ठरलेल्या कटानुसार चार मार्च रोजी मनसुखचा खून झाला
- या खुनाच्या कटात संतोष शेलारने त्याच्यासोबत आनंद जाधव, सतीश मोतिक्री, मनीष सोनी यांनाही सहभागी केले.
- तीन मार्च रोजी गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील माने यांनीही या हत्येच्या कटासाठी एका ओळखीच्या व्यक्तीकडून गाडी घेतली.
- चार मार्च रोजी रात्री उशिरा मनसुखची हत्या करण्यात आली.