Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

इस्रायलमधील वॉटरजेन कंपनीचा हवेपासून पाणी बनवणाऱ्या मशीनचा शोध!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
WaterGen Company

मुक्तपीठ टीम

सध्याच्या वातावरणात केवळ भारतातच नाही तर जगभरात पाणी कपातीचे संकट आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीच्या शोषणामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या सातत्याने वाढत आहे. काही देशांमध्ये पाण्याचा दुष्काळ पडला आहे. पाण्याची समस्या दूर करण्यासाठी काही कंपन्या सातत्याने प्रयत्न करत आहेत. इस्रायलच्या वॉटरजेन कंपनीनेही या दिशेने पाऊल उचलले आहे.

इस्रायलच्या ‘या’ कंपनीचा हवेपासून पाणी बनवणाऱ्या मशीनचा शोध! कारमध्येही बसवता येणार

  • इस्रायलच्या वॉटरजेन कंपनीने हवेतून शुद्ध पाणी बनवणारे मशीन विकसित केले आहे.
  • कारमध्ये मशीन बसवण्यातही कंपनीला यश आले आहे. यामुळे हे तंत्र अधिक प्रभावी झाले आहे.
  • कंपनीचे म्हणणे आहे की, ही कार कोणत्याही ब्रँडची असू शकते, एकदा ही मशीन बसवल्यानंतर ती सामान्य कार राहणार नाही.
  • कारच्या ट्रंकमध्ये हे मशीन बसवण्यात आले आहे.
  • पाणी देण्यासाठी नळ गाडीच्या गिअरबॉक्सजवळ ठेवला आहे.
  • सर्व मॉडेल्समध्ये मशीन बसवण्यासाठी कंपनी अनेक कार उत्पादकांशी चर्चा करत आहे.
  • वॉटरजेनने आधीच वॉटर जनरेटर बनवले आहेत, जे घर आणि ऑफिसमध्ये बसवले जात आहेत.

तेल अवीव येथील कंपनीच्या मुख्यालयाच्या छतावरील वॉटर जनरेटर २४ तासांत ८०० ते ९०० लिटर पाणी तयार करतो. अशा प्रकारे बनवलेल्या पाण्याची किंमत प्रति लिटर ५० ते ६० पैसे आहे.

घरगुती वापरासाठी बनवलेले मशीन २४ तासांत ३० लिटर पाणी बनवू शकते. हवेतील २० टक्के ओलावा मशीन सुरळीत चालण्यासाठी पुरेशी असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. यंत्राद्वारे हवेतील ओलावा शोषून तयार केलेल्या पाण्यात खनिजे मिसळली जातात, जेणेकरून पाणी पौष्टिक तसेच शुद्ध राहते.

‘या’ मशिनची भारतातही मागणी

  • भारतीय कंपनी एसएमव्ही इस्रायली कंपनीसोबत काम करत आहे.
  • भारतातही या मशीनला मागणी आहे.
  • वॉटरजेनचे सीईओ माया मुल्ला म्हणाले, “आम्हाला घर आणि ऑफिसमध्ये वापरल्या जाणाऱ्या दोन्ही मशीन्ससाठी भारतातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

भारतीय बाजारात त्याची किंमत २.५० लाखांपासून सुरू होते. शाळा-कॉलेज, आर्मी बेस कॅम्प, हॉस्पिटल्स, निवासी इमारती, बांधकाम स्थळे, रिसॉर्ट्स, उद्याने आणि पाण्याची समस्या असलेल्या ठिकाणी ही यंत्रे बसवता येतील.

 


Tags: good newsIsraelmuktpeethWater Making Machine From AirWaterGen Companyइस्रायलघडलं-बिघडलंचांगली बातमीमुक्तपीठवॉटरजेन कंपनीहवेपासून पाणी बनवणारी मशीन
Previous Post

हरित ऊर्जा वापराच्या क्षेत्रात गुंतवणूकीसाठी महाराष्ट्र उत्तम पर्याय – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

राजस्थानच्या उदयपूरचे मनमोहून टाकणारे उद्भूत सौंदर्य, ‘या’ प्रेक्षणीय स्थळांना नक्की भेट द्या!

Next Post
Udaipur

राजस्थानच्या उदयपूरचे मनमोहून टाकणारे उद्भूत सौंदर्य, 'या' प्रेक्षणीय स्थळांना नक्की भेट द्या!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!