मुक्तपीठ टीम
क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणी एनसीबीने केलेल्या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी टीका केली होती. यावेळी त्यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यांवरही टीका केली होती. आता या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी त्यांच्यावर काही दिवसांपासून पाळत ठेवली जात असल्याची तक्रार केली आहे. महाराष्ट्राचे डीजीपींकडे ही तोंडी तक्रार केल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे.
एनसीबी, पोलीस आणि पाळत…नेमकं प्रकरण काय आहे?
- समीर वानखेडे यांच्या आईचं ज्या स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आलं होतं त्या स्मशानभूमीत ते नेहमी जातात.
- ते २०१५ पासून तिथे जातात. अशाच भेटीदरम्यान दोन संशयित व्यक्ती त्यांचा पाठलाग करत असल्याचं त्यांना सोमवारी जाणवलं.
- विशेष म्हणजे त्यांनी पाठलाग करणाऱ्यांचे सीसीटीव्ही फुटेजही काढले आहे.
- त्यानंतर मुबंई पोलिसात तक्रार करत त्याचे सीसीटीव्ही फुटेज देत आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा दावा केला आहे.
- पाठलाग करणाऱ्या दोघांपैकी एक व्यक्ती ही मुंबई पोलीस दलात महत्त्वाच्या पदावर कार्यरत असलेली व्यक्ती आहे.
- या प्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
वानखेडेंवर पाळत ठेवली जातेय का?
- मलिकांनी पत्रकार परिषदेत व्हिडीओ दाखवत गौप्यस्फोट केले होते.
- एनसीबीने भाजपच्या नेत्यांसोबत मिळून शाहरुख खानला टार्गेट केल्याचा आरोप मलिकांनी केला होता.
- ज्यादिवशी ही कारवाई झाली त्यादिवशी काही भाजपा नेत्यांचे नातेवाईक त्यादिवशी क्रुझ पार्टीत उपस्थित होते.
- त्यावेळी त्यांना दिल्लीच्या दबावामुळे सोडण्यात आले, असा आरोप मलिकांनी केला होता.
- त्यानंतर आता वानखेडेंवर पाळत ठेवली जात असल्याची तक्रार पुढे आल्याने कोणीतरी एनसीबी अधिकाऱ्यांविरोधात पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत असावे, असा संशय व्यक्त होतोय.