Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य कसे चांगले राखता येईल? 

September 6, 2026
in आरोग्य, व्हा अभिव्यक्त!
0
work place

डॉ. वृषाली रामदास राऊत

“श्री नारायण मेघाजी लोखंडे यांनी सुरू केलेली रविवारची सुट्टी ही कामगारांच्या मानसिक, शारीरिक व सामाजिक आरोग्यासाठी उचलेलले पहिले पाऊल म्हणता येईल. स्वातंत्र्यानंतर भारताच्या प्रगतीमध्ये कामगारांचे योगदान अतुलनीय आहे. भारतात occupational health म्हणजे कामाच्या संबधित आरोग्य याकडे पाहिजे तितक लक्ष्य दिल्या गेल नाही व व्यावसायिक आरोग्याचे कायदे अपुरे आहेत. भारतात कामाच्या ठिकाणच्या शारीरिक आरोग्यासाठी मोजके कायदे असून कामामुळे होणार्‍या मानसिक आरोग्याकडे संपूर्ण दुर्लक्ष झाले आहे.

भारतात मानसिक आरोग्यावर बोलणे हे अजूनही निषिद्ध मानले जाते कारण मानसिक आरोग्य म्हणजे वेडेपणा ही भारतीयांची समजूत आहे. परंतु कामामुळे येणारा ताण हा चिंता, औदासिन्य व विविध प्रकारची व्यसन यांना कारणीभूत ठरतो. त्यामुळे कामगारांच्या शारीरिक आरोग्यावर, उत्पादन क्षमतेवर व त्याच्या नातेसंबधावर परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते मानसिक आरोग्य हे मानसिक भांडवल आहे व त्याचा संबध त्या देशाच्या जीडीपी व सार्वजनिक आरोग्याशी आहे.
औद्योगिक/संघटनात्मक मानसशास्त्र ( Industrial/Organizational Psychology) या विषयात मानसशास्त्राचा वापर करून कामाच्या ठिकाणच्या वेगवेगळ्या घटकांवर काम केल जात ज्यात कामाच्या पद्धतीत आवश्यक बदल करून कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य कसे राखता येईल याचा समावेश आहे. युरोप, अमेरिका, न्यूझीलँड, ऑस्ट्रेलिया व कॅनडा या देशात औद्योगिक/संघटनात्मक मानसशास्त्रज्ञ मोठ्या प्रमाणावर काम करतात मात्र भारतात मात्र चित्र फार वेगळे आहे. गेल्या काही वर्षात औद्योगिक/संघटनात्मक मानसशास्त्र हा विषय भारतात नावापुरता आहे.
एक औद्योगिक मानसशास्त्रज्ञ म्हणून मी माझ्या पहिल्या मराठी पुस्तकात कामाच्या संबंधित मानसिक आरोग्याचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून ऊहापोह केला आहे. भारताची आरोग्यासंबंधी सद्यस्थिती, मानसिक आरोग्य व त्यावर परिणाम करणारे घटक, कामाच्या ठिकाणच्या मानसिक आरोग्यावर प्रामुख्याने परिणाम करणारे घटक ज्यात भावना, झोप, ताण, व्यसन व ergonomics या गोष्टी येतात याचा संशोधनात्मक पद्धतीने सविस्तर आढावा घेतला आहे. कुठल्याही कामामुळे शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होतो ज्याचा job safety analysis चा वापर करून अभ्यास केला जातो व त्यावरून शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी उपाय सुचविले जातात. याबद्दल मी सविस्तर लिहिलं आहे जेणेकरून या पद्धतीच महत्व कळेल.
मानव संसाधन विभाग व त्याची भारतातील परिस्थिति, लॉकडाउन मुळे भारतीय कामगार विश्वावर झालेले परिणाम, मानसिक आरोग्याचा कार्यक्षमतेवर होणारा परिणाम व कामाच्या ठिकाणच वेल-बीइंग अश्या महत्वाच्या पण दुर्लक्षित विषयावर मी पुस्तकात भाष्य केले आहे.
एकंदरीत शिक्षण,आरोग्य व मानव संसाधन या तिन्ही क्षेत्राचा एकमेकांशी असलेला संबध  व त्यांचा भारताच्या सार्वजनिक आरोग्यावर होणारा दूरगामी परिणाम व त्यातून निर्माण होणारे प्रश्न याकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न या पुस्तकाद्वारे केला आहे.
हे पुस्तक मैत्री प्रकाशन, पुणे यांच्यातर्फे १० ऑक्टोबर म्हणजे जागतिक मानसिक आरोग्य दिनी प्रकाशित होत आहे. यासंबंधी अधिक माहिती मी माझ्या डॉ. वृषाली रामदास राऊत या नावाने असलेल्या वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन माहिती देईन.
vrushali raut

(लेखिका डॉ. वृषाली रामदास राऊत या औद्योगिक मानसशास्त्रज्ञ आहेत. कामाच्या ठिकाणी कर्मचारी, कामगार यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यास करुन योग्य वातावरणनिर्मितीच्या माध्यमातून ती समस्या सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.)

ट्विटर @DrVrushaliRaut1


Tags: healthpsychological healthVrushali Rautमानसिक आरोग्य
Previous Post

मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी शिवसेनेची कोंडी वाढणार?

Next Post

मुंबईच्या अपना सहकारी बँकेनं रिझर्व्ह बँकेचं ऐकलं नाही! ७९ लाखांचा दंड!

Next Post
rbi

मुंबईच्या अपना सहकारी बँकेनं रिझर्व्ह बँकेचं ऐकलं नाही! ७९ लाखांचा दंड!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!