Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘ट्रू व्होटर मोबाईल ॲप’मुळे मतदारांना सुविधा, अडीच हजारांपेक्षा जास्त हरकती नोंदवल्या!

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
true voter mobile app true voter mobile app

मुक्तपीठ टीम

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या अंतिम मतदार यादीत नाव शोधण्यासाठी ऐनवेळी धावपळ होऊ नये यासाठी ‘ट्रू व्होटर मोबाईल ॲप’ची सुविधा आता उपलब्ध आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी दिली. त्याचा फायदा घेत अवघ्या १४ दिवसांमध्ये ‘ट्रू व्होटर मोबाईल ॲप’वर अडीच हजारांपेक्षा जास्त हरकती नोंदवल्या गेल्या आहेत. कुरुंदकर यांनी सांगितले की, मतदार, उमेदवार, राजकीय पक्ष आणि निवडणूक यंत्रणेच्या सोयीसाठी राज्य निवडणूक आयोगाने ‘ट्रू व्होटर’ मोबाईल ॲप विकसित केले आहे. राज्यभरातील विविध १४ महानगरपालिकांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांत नाव शोधण्याची सुविधादेखील अलीकडे उपलब्ध करून देण्यात आली होती. त्याचबरोबर आपल्या नावासंदर्भात काही हरकती किंवा सूचना असल्यास त्याही या ॲपद्वारे नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

ट्रू- व्होटर मोबाईल ॲपमुळे मतदारांनी स्वत: प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीत आपली नावे शोधली व त्यावरील हरकती आवश्यक कागदपत्र व पुराव्यांसह स्वत:च नोंदविल्या. केवळ तीन ते चार दिवसांत असे आक्षेप नोंदविणाऱ्यांची संख्या २ हजार ७७० इतकी होती. त्याचबरोबर या कालावधीत सुमारे पंधरा लाखांपेक्षा जास्त मतदारांनी आपले नाव शोधण्यासाठी या ॲपचा वापर केला. त्यासाठी जवळपास ५० हजारांपेक्षा जास्त मतदारांनी हे ॲप आपल्या मोबाईलवर फोनमध्ये इन्स्टॉल केले. आता आगामी निवडणुकांच्या प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्यांमध्येही या ॲपच्या माध्यमातून आपले नाव शोधता येईल, असेही श्री. कुरुंदकर यांनी सांगितले.

 


Tags: good newsmuktpeethTrue Voter Mobile Appvoter facilityचांगली बातमीट्रू व्होटर मोबाईल ॲपमतदार सुविधामुक्तपीठ
Previous Post

मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर पत्रकारिता अभ्यासक्रमांना प्रवेश सुरु! असा करा अर्ज…

Next Post

पॅन कार्ड आधारशी लिंक करणे जाणून घ्या कोणासाठी आवश्यक नाही?

Next Post
adhar pan

पॅन कार्ड आधारशी लिंक करणे जाणून घ्या कोणासाठी आवश्यक नाही?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!