Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

११ लाखांची कार, २२ लाखांचं दुरुस्ती बिल! अॅमेझॉनच्या अधिकाऱ्याला फॉक्सवॅगनचा झटका!!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Volkswagen Cars

मुक्तपीठ टीम

११ लाखांच्या कारचे दुरुस्ती बिल २२ लाख रुपये… एकूण धक्का बसला ना? हो हे घडलं आहे. हे प्रकरण बंगळुरूच्या एका व्यक्तीसोबत घडलं आहे. बंगळुरूत मुसळधार पावसाचा सिलिकॉन सिटीला फटका पडला आहे. रस्त्यांवर तीन ते चार फूट पाणी साचले होते. लोक जेसीबी, ट्रॅक्टरने कार्यालयात ये-जा करत होते. अशा परिस्थितीत, पाणी साचल्याने नागरिकांची वाहने आठवडाभर पाण्यात अडकून पडली होती.

या संकाटात एका प्रकल्प व्यवस्थापकाची गाडीही आठवडाभर पाण्यात अडकली होती. पाणी बाहेर येईपर्यंत गाडीचे काच फुटले होते. यानंतर त्यांनी गाडी दुरुस्तीला पाठवली. ज्यावेळी गाडी दुरुस्ती झाली, तेव्हा मात्र गाडीचे दुरुस्ती बिल पाहून तो व्यक्ती विचारातच पडला. कारण गाडीच्या दुरुस्तीचे बिल २२ लाख रुपये झाले होते. ११ लाख रुपयांच्या कारच्या दुरुस्तीचे २२ लाखांचे बिल पाहून कोणाचेही मन खचणे स्वाभाविक आहे.

‘या’ प्रकरणाविषयीची सविस्तर माहिती

  • अॅमेझॉन अधिकाऱ्याचे नाव अनिरुद्ध गणेश असे आहे.
  • अनिरुद्धने याबद्दलची माहिती लिंक्डइनवर दिली आहे.
  • आपल्या पोस्टमध्ये त्यांने लिहिले आहे की, ११ लाख रुपये किंमतीची कार रिपेअरिंग सेंटरमध्ये दुरुस्तीसाठी पाठवली आहे.
  • त्याला याचे २२ लाखांचे बिल आले. अनिरुद्ध गणेश अॅमेझॉनमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत.
  • त्यांच्याकडे फॉक्सवॅगन कंपनीची कार आहे.

कंपनीला मेल केल्यावर पाच हजारात बिल ठरले

  • यानंतर अनिरुद्धने फोक्सवॅगन मॅनेजमेंटला पुन्हा ई-मेल पाठवून आपल्या समस्येबद्दल माहिती दिली.
  • प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे कंपनीला कळताच अखेर केवळ पाच हजार रुपयांत प्रकरण मिटले.
  • सध्या त्याने सोशल मीडियावर आपली कहाणी शेअर केल्यावर हे प्रकरण समोर आले.

अनिरुद्धने त्याची कार व्हाईटफिल्ड परिसरात असलेल्या फोक्सवॅगनच्या अधिकृत रिपेअरिंग सेंटरमध्ये दुरुस्तीसाठी पाठवली होती. जिथून त्याला २२ लाख रुपयांचे दुरुस्तीचे बिल पाठवण्यात आले. त्यांनी विरोध केला असता, सर्व्हिस सेंटरने त्यांच्याकडून खराब झालेल्या कारची कागदपत्रे तयार करण्यासाठी ४४ हजार ८४० रुपयांची मागणी केली. यामुळे अनिरुद्ध गणेशला धक्का बसला.


Tags: Amazon OfficialsBangaloremuktpeethRepair BillVolkswagen Carsअॅमेझॉन अधिकारीघडलं-बिघडलंदुरुस्ती बिलफॉक्सवॅगन कारबंगळुरूमुक्तपीठ
Previous Post

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा, ०३ ऑक्टोबर २०२२ दुपार

Next Post

IAS अधिकारी महिलेकडे सॅनिटरी नॅपकिन मागणाऱ्या रियाला जाहिरातीची ऑफर!

Next Post
Riya Kumari

IAS अधिकारी महिलेकडे सॅनिटरी नॅपकिन मागणाऱ्या रियाला जाहिरातीची ऑफर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!