मुक्तपीठ टीम
११ लाखांच्या कारचे दुरुस्ती बिल २२ लाख रुपये… एकूण धक्का बसला ना? हो हे घडलं आहे. हे प्रकरण बंगळुरूच्या एका व्यक्तीसोबत घडलं आहे. बंगळुरूत मुसळधार पावसाचा सिलिकॉन सिटीला फटका पडला आहे. रस्त्यांवर तीन ते चार फूट पाणी साचले होते. लोक जेसीबी, ट्रॅक्टरने कार्यालयात ये-जा करत होते. अशा परिस्थितीत, पाणी साचल्याने नागरिकांची वाहने आठवडाभर पाण्यात अडकून पडली होती.
या संकाटात एका प्रकल्प व्यवस्थापकाची गाडीही आठवडाभर पाण्यात अडकली होती. पाणी बाहेर येईपर्यंत गाडीचे काच फुटले होते. यानंतर त्यांनी गाडी दुरुस्तीला पाठवली. ज्यावेळी गाडी दुरुस्ती झाली, तेव्हा मात्र गाडीचे दुरुस्ती बिल पाहून तो व्यक्ती विचारातच पडला. कारण गाडीच्या दुरुस्तीचे बिल २२ लाख रुपये झाले होते. ११ लाख रुपयांच्या कारच्या दुरुस्तीचे २२ लाखांचे बिल पाहून कोणाचेही मन खचणे स्वाभाविक आहे.
‘या’ प्रकरणाविषयीची सविस्तर माहिती
- अॅमेझॉन अधिकाऱ्याचे नाव अनिरुद्ध गणेश असे आहे.
- अनिरुद्धने याबद्दलची माहिती लिंक्डइनवर दिली आहे.
- आपल्या पोस्टमध्ये त्यांने लिहिले आहे की, ११ लाख रुपये किंमतीची कार रिपेअरिंग सेंटरमध्ये दुरुस्तीसाठी पाठवली आहे.
- त्याला याचे २२ लाखांचे बिल आले. अनिरुद्ध गणेश अॅमेझॉनमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत.
- त्यांच्याकडे फॉक्सवॅगन कंपनीची कार आहे.
कंपनीला मेल केल्यावर पाच हजारात बिल ठरले
- यानंतर अनिरुद्धने फोक्सवॅगन मॅनेजमेंटला पुन्हा ई-मेल पाठवून आपल्या समस्येबद्दल माहिती दिली.
- प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे कंपनीला कळताच अखेर केवळ पाच हजार रुपयांत प्रकरण मिटले.
- सध्या त्याने सोशल मीडियावर आपली कहाणी शेअर केल्यावर हे प्रकरण समोर आले.
अनिरुद्धने त्याची कार व्हाईटफिल्ड परिसरात असलेल्या फोक्सवॅगनच्या अधिकृत रिपेअरिंग सेंटरमध्ये दुरुस्तीसाठी पाठवली होती. जिथून त्याला २२ लाख रुपयांचे दुरुस्तीचे बिल पाठवण्यात आले. त्यांनी विरोध केला असता, सर्व्हिस सेंटरने त्यांच्याकडून खराब झालेल्या कारची कागदपत्रे तयार करण्यासाठी ४४ हजार ८४० रुपयांची मागणी केली. यामुळे अनिरुद्ध गणेशला धक्का बसला.