मुक्तपीठ टीम
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सत्ताधारी आघाडीला ‘जोर का झटका धीरे से’ दिला आहे. आघाडीने आवाजी मतदानाने विस अध्यक्षपद निवडणूक प्रक्रिया घेण्याचे जाहीर करून ती निर्धोक करण्याचा प्रयत्न केला. पण आघाडीचा तोच निर्णय राज्यपालांमुळे धोक्याचा ठरला. आघाडीकडे १७०चे बहुमत असल्याचा दावा आघाडीचे नेते करतात, पण आज ते १७० चे बहुमत असूनही एकामुळे अध्यक्षपद निवडीचे काम अडले.
राज्यपालांमुळे आघाडीचे अडले, भाजपाचे चालले!
- भगत सिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला लिहिलं पत्रं
- विधानसभा अध्यक्षाच्या निवड प्रक्रियेबाबत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला पत्रं पाठवून उत्तर दिलं आहे.
- विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नियम बदलची प्रक्रिया घटनाबाह्य असल्याचा उल्लेख राज्यपालांनी पत्रात केला आहे.
- त्यामुळे उद्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार की नाही याबाबतची शंका निर्माण झाली होती.
राज्यपालांच्या भेटीला आघाडीचे नेते
- राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया बदलण्यात आली असून त्याला मंजुरी देण्याची विनंती केली होती.
- त्यावर राज्यपालांनी उद्यापर्यंत सांगतो असं उत्तर दिलं होतं.
- त्यानुसार राज्यपालांनी आपले उत्तर कळवले असून थेट निवड प्रक्रियेवरच बोट ठेवलं आहे.
आवाजी मतदानाने निवडणूक घेण्याचा निर्णय घटनाबाह्य ठरवला!
- आघाडी सरकारने अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेत बदल केला होता.
- पूर्वी गुप्त मतदानाने ही निवडणूक होत होती.
- मात्र, सरकारने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक खुल्या पद्धतीने घेण्यासाठी नियम बदलला होता.
- आघाडीच्या या निर्णयाला भाजपाने विरोध केला होता.
- आवाजी मतदानाने निवडणूक घेण्याचा हा निर्णय घेण्यात आल्याने तो घटनाबाह्य असल्याचं राज्यपालांचं म्हणणं आहे.