Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘म्याव म्याव’ करणे महाग पडणार? नितेश राणेंच्या निलंबनासाठी शिवसेना आक्रमक!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
bhaskar jadhav and nitesh rane

मुक्तपीठ टीम

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सभागृहात येतातच भाजपा आमदार नितेश राणे यांनी म्याव म्याव असा आवाज काढला होता. त्याचे पडसाद आजही सभागृहात उमटल्याचे दिसले आहेत. नितेश राणे यांना म्याव म्यावचा आवाज चांगलाच भारी पडला आहे. नितेश राणेंना निलंबित करण्यासाठी शिवसेनाच्या नेत्यांनी सभागृहात प्रचंड गोंधळ घातला आहे. त्यांच्या निलंबनाच्या मागणीनंतर विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं.

 

जर कोणी वाईट बोललं तर खपवून घेणार नाही- सुहास कांदे

  • आमदार सुहास कांदे यांनी हा विषय सभागृहात मांडला.
  • त्यांनी सांगितलं की, आदित्य ठाकरे यांच्यावर नितेश राणे यांनी टीका केली होती.
  • त्यावर नितेश राणे यांनी पुन्हा आपण असं बोलणार असं म्हटलं आहे.
  • हे खपवून घेतलं जाणार नाही.
  • मोदींपेक्षा जरी आदित्य ठाकरे लहान असले तरी त्यांच्यावर अशाप्रकारे टीका करणं योग्य नाही.
  • जर कोणी वाईट बोललं तर खपवून घेतलं जाणार नाही, असं कांदे म्हणाले.

 

चुकीला माफी नाही-सुनील प्रभू

  • यावेळी सुनील प्रभू यांनीही नितेश राणे प्रकरणावरून विरोधकांवर हल्ला चढवला.
  • त्या दिवशी मी हा मुद्दा उपस्थित केला होता.
  • तेव्हाही चर्चा झाली.
  • तेव्हाही ठरलं नेत्यांबाबत नीट‌ बोललं पाहिजे.
  • चुकीला माफी नाही.
  • त्यामुळे नितेश राणेंना निलंबित केलंच पाहिजे.

 

नितेश राणेंना कायमस्वरूपी निलंबित करा- भास्कर जाधव

  • हा विषय अत्यंत गंभीर आहे.
  • एखाद्या नेत्याबद्दल असं बोलणं योग्य नाही.
  • मी मोदींबद्दल बोललो.
  • तेव्हा मी माफी मागितली.
  • तुमच्यासाठी जसे मोदी आहेत.
  • तसेच आमच्यासाठी आदित्य ठाकरे आहेत.
  • त्यामुळे नितेश राणेंना कायमस्वरुपी निलंबित करा, अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली.

 

सभागृहात माजला गोंधळ

  • भास्कर जाधव हातावर हात मारून जोरजोरात आपलं म्हणणं मांडत होते.
  • त्याचवेळी विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली.
  • त्यामुळे सत्ताधारी सदस्यांनीही जोरजोरात घोषणा देण्यास सुरुवात केली.
  • हा गोंधळ अधिकच वाढल्याने अखेर सभागृहाचे कामकाज दहा मिनिटासाठी तहकूब करण्यात आले.

Tags: nitesh raneShivsena
Previous Post

शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी अण्णा हजारे लक्ष घालणार!

Next Post

राज्यपाल कोश्यारींचा आघाडीला हळूवारपणे मोठा धक्का…१७०चं बहुमत, पण एकामुळे काम अडलं!

Next Post
bhagat singh koshyari

राज्यपाल कोश्यारींचा आघाडीला हळूवारपणे मोठा धक्का...१७०चं बहुमत, पण एकामुळे काम अडलं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!