मुक्तपीठ टीम
नागपूरमध्ये व्हीएनआयटीत म्हणजेच विश्वेश्वरैया राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थानात सुपरिंटेंडेंट, पर्सनल असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट, सिव्हिल ज्युनियर इंजिनीअर, इलेक्ट्रिकल ज्युनियर इंजिनीअर, लायब्ररी अॅंड इन्फॉर्मेशन असिस्टंट, एसएएस असिस्टंट, ऑफिस अटेंडेंट/ लॅब अटेंडेंट, ज्युनियर असिस्टंट, सिनियर असिस्टंट, स्टनोग्राफर, सिनियर स्टनोग्राफर, टेक्निशियन, सिनियर टेक्निशियन या पदांसाठी एकूण १२४ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १६ डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण नाशिक आहे.
शैक्षणिक पात्रता
- पद क्र.१- १) फर्स्ट ग्रेड पदवी किंवा ५०% गुणांसह पदव्युत्तर पदवी २) संगणक अनुप्रयोगांचे ज्ञान उदा. वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेड शीट
- पद क्र.२- १) फर्स्ट ग्रेड पदवी किंवा ५०% गुणांसह पदव्युत्तर पदवी २) स्टेनोग्राफी
- पद क्र.३- फर्स्ट ग्रेड बीई/ बीटेक/ एमसीए किंवा फर्स्ट ग्रेड इंजिनीअरिंग डिप्लोमा/ फर्स्ट ग्रेड बीएससी/ ५०% गुणांसह एमएससी
- पद क्र.४- फर्स्ट ग्रेड बीई/ सिव्हिल बीटेक किंवा फर्स्ट ग्रेड सिव्हिल इंजिनीअरिंग डिप्लोमा
- पद क्र.५- फर्स्ट ग्रेड बीई/ इलेक्ट्रिकल बीटेक किंवा फर्स्ट ग्रेड इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा
- पद क्र.६- १) फर्स्ट ग्रेड विज्ञान/ कला/ वाणिज्य पदवी २) ग्रंथालय आणि माहिती विज्ञान पदवी
- पद क्र.७- शारीरिक शिक्षणात फर्स्ट ग्रेड पदवी
- पद क्र.८- १२वी उत्तीर्ण / विज्ञान क्षेत्रात १२वी उत्तीर्ण
- पद क्र.९- १) १२वी उत्तीर्ण २) संगणकावर टायपिंग
- पद क्र.१०- १) १२वी उत्तीर्ण २) संगणकावर टायपिंग
- पद क्र.११- १) १२वी उत्तीर्ण २) शॉर्ट हॅंड
- पद क्र.१२- १) १२वी उत्तीर्ण २) शॉर्ट हॅंड
- पद क्र.१३- ६०% गुणांसह विज्ञान क्षेत्रात १२वी उत्तीर्ण/ ५०% गुणांसह १२वी उत्तीर्ण + आयटीआय किंवा ५०% गुणांसह १२वी उत्तीर्ण+आयटीआय किंवा इंजिनीअरिंग डिप्लोमा
- पद क्र.१४- ६०% गुणांसह विज्ञान क्षेत्रात १२वी उत्तीर्ण किंवा ५०% गुणांसह १२वी उत्तीर्ण +आयटीआय किंवा ५०% गुणांसह १२वी उत्तीर्ण+आयटीआय किंवा इंजिनीअरिंग डिप्लोमाअसणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३३ या दरम्यान असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ४०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी व्हीएनआयटीच्या अधिकृत वेबसाइट https://vnit.ac.in/ वरून माहिती मिळवू शकता.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
रजिस्ट्रार, विश्वेश्वरैया राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर- ४४००१०
नोकरीची लिंक
https://drive.google.com/file/d/169OvG8FwheZl7_6f0YjoXtqbI_BaY7Yx/view
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/169OvG8FwheZl7_6f0YjoXtqbI_BaY7Yx/view