मुक्तपीठ टीम
व्हीएलसी मीडिया प्लेयर हे ऑडिओ/व्हिडिओ स्ट्रीमिंग सॉफ्टवेअर आहे. भारत सरकारने दूरसंचार विभागाच्या (DOT) मार्गदर्शक तत्त्वांनुसार व्हीएलसीवर घातलेली बंदी हटवली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने युजर्सना मेसेज पाठवून ही बंदी हटवण्याबाबत माहिती दिली आहे.
बंदी हटवण्याचे कारण अद्याप स्पष्ट नाही…
- या वर्षाच्या सुरुवातीला भारत सरकारने व्हीएलसी मीडिया प्लेयरवर बंदी घातली होती.
- व्हीएलसी मीडिया प्लेयरवर युजर्सचा डेटा आणि त्यांच्याशी संबंधित माहिती शत्रू देशांना विकल्याचा आरोप होता.
- या आधी VideoLan ची वेबसाइट Onmyoji Arena नावाच्या अॅपशी सतत संवाद साधत आहे आणि हे अॅप भारताच्या MeitY ने प्रतिबंधित केलेल्या ५४ अॅप्सपैकी एक आहे.
- भारताच्या विविध मंत्रालयांसह व्हीएलसी अधिकार्यांसह दीर्घ बैठकीनंतर वेबसाइटवर लादलेली बंदी उठवण्यात आली आहे.
- ही बंदी का उठवण्यात आली आहे, याचे स्पष्टीकरण अद्याप समोर आलेले नाही.
कलम ६९ (ए) अंतर्गत बंदी
- माहिती तंत्रज्ञान कायदा ६९ (ए) अंतर्गत भारतात त्यावर बंदी घालण्यात आली.
- बंदी घातल्यानंतर, युजर्स देशात या वेबसाइटवर प्रवेश करू शकत नाही.
- युजर्सना इच्छा असूनही साइटवर जाऊन हे अॅप डाउनलोड करता येत नव्हते.
- स्मार्टफोनवरील व्हीएलसीचे अॅप पूर्वीप्रमाणेच काम करत होते.
- आता पुन्हा डाऊनलोड शक्य होणार आहे.
व्हीएलसीला कायदेशीर नोटीस…
- व्हिडिओलानने गेल्या महिन्यात इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि दूरसंचार विभागाला नोटीस पाठवली होती.
- भारतात त्यांच्यावर बंदी का घालण्यात आली आहे, असा सवाल त्यांना करण्यात आला.
- व्हीएलसीने भारतात इंटरनेट फ्रीडम फाऊंडेशनचीही मदत घेतली.
- जून महिन्यात IFF ने RTI दाखल करत DoT ला त्यांची वेबसाइट ब्लॉक करण्यामागचे कारण विचारले होते.
- हे प्रकरण पुढे घेऊन दूरसंचार विभागाने ते इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे हस्तांतरित केले.