Monday, May 19, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

संवर्धनासाठी प्राधान्य प्रजाती म्हणून स्थानिक पक्षी आणि प्राण्यांवर लक्ष केंद्रित करा – केंद्रीय मंत्री भूपेंदर यादव

जागतिक मानांकानुसार श्रेणी सुधारण्यासाठी भारतीय प्राणीसंग्रहालयांसाठी व्हिजन प्लॅन (२०२१-२०३१) जारी

October 12, 2021
in featured, घडलं-बिघडलं, निसर्ग
0
gujarat

मुक्तपीठ टीम

गुजरातमधील केवडिया येथील सरदार पटेल प्राणीशास्त्र उद्यान येथे केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या वतीने प्राणिसंग्रहालय संचालक आणि पशुवैद्यकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा आज समारोप झाला.

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री, भूपेंदर यादव यांनी आपल्या विशेष भाषणात, प्रजाती संवर्धनाच्या प्रयत्नांसाठी सर्वांचे अभिनंदन केले आणि वन्यजीव, वन्य अधिवास आणि नैसर्गिक स्रोतांच्या सर्वांगीण संरक्षणाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले.

राज्याच्या वनमंत्र्यांच्या चर्चेदरम्यान प्राणिसंग्रहालय हा चर्चेसाठी महत्त्वाचा विषय असेल याची खात्री करून, केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांनी प्राणिसंग्रहालयांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी तसेच उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्व आणि सार्वजनिक खाजगी भागीदारी विचारात घेण्यासाठी तसेच संवर्धनासाठी प्राधान्य प्रजाती म्हणून स्थानिक पक्षी आणि प्राण्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्राणी संग्रहालयांना प्रोत्साहित केले.

संवर्धन जागृतीचे महत्त्व आणि संघर्ष निवारण धोरणांमध्ये त्याचे मूल्य आणि प्राणीसंग्रहालय आणि नगरवनांसाठी प्राणीसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांच्या सूचनांचा समावेश करून एक सर्वसमावेशक प्रस्तावित मार्ग आणि अल्प आणि दीर्घकालीन कृती योजना तयार करण्यासाठी या सूचना उपयोगात आण्याव्यात हे मुद्दे त्यांनी अधोरेखित केले.

देशातील प्राणिसंग्रहालय व्यवस्थापनातील नवीन क्षितीजे आणि संवर्धनासंदर्भातील भूतकाळातील परिस्थिती यवर चर्चा आणि उहापोह करणे हे या राष्ट्रीय परिषदेचे प्राथमिक उद्दिष्ट होते. आजपर्यंत देशात वन्य प्राणी कल्याणाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे आणि उच्च मानकांचे पालन करणारी १५० हून अधिक मान्यताप्राप्त प्राणीसंग्रहालय आणि बचाव केंद्र आहेत.

गुजरात सरकारचे वन आणि पर्यावरण मंत्री किरिटसिंह राणा यांच्यासह केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या तीन महत्त्वाच्या प्रकाशनांचे प्रकाशन केले.

व्हिजन प्लॅन (२०२१-२०३१)

  • प्राणीसंग्रहालयांसाठी पाणी, आरोग्यविषयक काळजी आणि स्वच्छता नियम पुस्तिका
  • स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव – एक संकलन (व्हीओआय १)- सीझेडए
  • समारोप प्रसंगी, इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती सुधा मूर्ती यांचा सत्कार करण्यात आला.

वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभागाची निर्मित असलेला ‘निसर्गाशी सुसंवाद ठेवा, वन्यजीवांचा अवैध व्यापार थांबवा’ या नावाचा एक जनजागृतीपर चित्रपटही यावेळी प्रदर्शित करण्यात आला. मान्यवरांनी केंद्रीय प्राधिकरणाच्या वतीने दिले जाणारे प्राणीमित्र पुरस्कार देखील प्रदान केले. उत्कृष्ट कार्यासाठी प्राणिसंग्रहालयाचे संचालक/प्राणी संग्रहालय संरक्षक, जीवशास्त्रज्ञ/शिक्षणतज्ज्ञ, पशुवैद्य आणि पशुपालक/ प्राणीसंग्रहालयात आघाडीवर कार्यरत असणारे या चार श्रेणींमध्ये दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात.

या वर्षीचे विजेते आहेत:

  • उत्कृष्ट पशुपालक – श्रीमती लखीदेवी, भगवान बिरसा प्राणी उद्यान, रांची झारखंड.
  • उत्कृष्ट शिक्षणतज्ज्ञ/जीवशास्त्रज्ञ – श्री हरपाल सिंह, शिक्षणतज्ज्ञ महेंद्र चौधरी प्राणी उद्यान, चटबीर, पंजाब.
  • उत्कृष्ट पशुवैद्य – डॉ इलिया राजा, आग्रा अस्वल बचाव सुविधा, उत्तर प्रदेश
  • उत्कृष्ट संचालक – डॉ विभू प्रकाश माथूर, संचालक, गिधाड संवर्धन प्रजनन केंद्र, पिंजोर, हरियाणा.
  • भारतीय प्राणीसंग्रहालयांसाठी व्हिजन प्लॅन (२०२१-२०३१) डाउनलोडकरण्यासाठी/पहाण्यासाठी येथे क्लिक करा

Tags: central environment ministerdr vibhu prakash mathurDr. Illya RajaForest and Climate Change Minister Bhupendra Yadavgujarathharpaal singhKirit Singh RanalakhideviMinister of Forests and EnvironmentSardar Patel Zoological Parkzoological parkकेंद्रीय पर्यावरणमंत्रीगुजरातगुजरात वन आणि पर्यावरण मंत्री किरिटसिंह राणाडॉ इलिया राजाडॉ विभू प्रकाश माथूरप्राणिसंग्रहालयवन आणि हवामान बदल मंत्री भूपेंदर यादवश्रीमती लखीदेवीसरदार पटेल प्राणीशास्त्र उद्यानहरपाल सिंह
Previous Post

मराठी माणसांना घरे नाकारणाऱ्यांवर अखेर गुन्हा! मराठी एकीकरण समितीचा दणका!!

Next Post

राजर्षी शाहू महाराज साखर कारखान्याचा गोड निर्णय, शेतकऱ्यांना ऊसाची एकरकमी एफआरपी!

Next Post
sugar Factory

राजर्षी शाहू महाराज साखर कारखान्याचा गोड निर्णय, शेतकऱ्यांना ऊसाची एकरकमी एफआरपी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!