Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राजर्षी शाहू महाराज साखर कारखान्याचा गोड निर्णय, शेतकऱ्यांना ऊसाची एकरकमी एफआरपी!

समजून घ्या एफआरपी म्हणजे काय?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
sugar Factory

मुक्तपीठ टीम

एकीकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हक्काच्या एफआरपीसाठी ताटकळवलं जात असतानाच कोल्हापूरातून एक गोड बातमी आली आहे. गेल्या काही काळात महापूर, कोरोना, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट बनली असल्यानं ती जास्तच गोड आहे. दरम्यान एकरकमी एफआरपी देण्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले असले तरी राज्य सरकारने मात्र अजून आपली भूमिका स्पष्टपणे मांडलेली नाही. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सहाय्य म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील छत्रपती शाहू कारखान्याने एक रकमी एफआरपी देण्याची घोषणा केली आहे. कारखान्याचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

 

समरजित घाटगे यांनी जाहीर केला गोड निर्णय

  • राज्यातील इतर साखर कारखान्यांनीही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची वेळ आली आहे.
  • कारखानदारी पूर्णपणे सावरली आहे असं चित्र नाही.
  • मात्र, आर्थिक ताळमेळ पाहता एकरकमी एफआरफी शक्य आहे.
    आम्हाला यात राजकारण आणायचं नाही.
  • मात्र, शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायची हीच वेळ आहे.
  • राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या शेतकरी केंद्री विचारांचा वारसा जपत आपल्या बळीराजाला शक्य ती सर्व मदत करण्यासाठी शाहू समूह कायम तत्पर आहे.
  • ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा कारखाना नेहमीच मदतीचा हात पुढे करतो.
    त्यामुळे एक रकमी एफआरपी बाबत तातडीने घोषणा करत आम्ही शेतकऱ्यांना दिलासा देणारे पाऊल टाकले आहे.’

 

एफआरपी म्हणजे काय?

  • एफआरपी म्हणजे फेअर रेम्युनरेटिव्ह प्राईस याचा मराठीतील अर्थ रास्त आणि किफायतशीर दर.
  • सोप्या भाषेत साखर कारखान्यांनी ऊसाला दिलेला प्रतिटन दर
    ऊसाचा एकूण उत्पादन खर्च आणि त्यावरील साधारण १५ टक्के नफा गृहित धरुन एफआरपी ठरवला जातो.
  • २००९ पूर्वी ऊसदर नियंत्रण कायदा, १९६६ च्या खंड ३ मधील तरतुदींच्या आधारे केंद्र सरकार साखरेच्या प्रत्येक हंगामासाठी ऊसाचा एसएमपी म्हणजेच वैधानिक किमान भाव म्हणजेच निश्चित करत असे.
  • त्यानंतर सरकारने २२ ऑक्टोबर २००९ रोजी ऊसदर नियंत्रण कायद्यात दुरुस्ती केली.
  • या कायद्यात ऊस उत्पादकांचा खर्च लक्षात घेऊन माफक नफा मिळण्याची तरतूद केली आहे.
  • त्यानुसार साखरेच्या हंगामांचा एफआरपी निश्चित करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. केंद्र सरकारचा कृषी आयोग हा दर ठरवतं.

 

एफआरपीमुळे शेतकऱ्यांचा फायदा कसा?

  • याचाच अर्थ सारख कारखाने कायद्याने एफआरपीपेक्षा कमी दर देऊ शकत नाहीत.
  • पण एफआरपीपेक्षा जास्त दर द्यायचा असल्यास राज्य सरकार किंवा साखर कारखाने तशी तरतूद करु शकतात.
  • तसेच एफआरपी हा कारखान्यांनी शेतकऱ्यांना एकरकमीच द्यावा, असे बंधनकारक आहे.
  • पण अनेक कारखाने तसे करत नाहीत. उलट सत्तेतील साखरसम्राटही त्यांना त्यासाठी सहाय्यकारी वागतात.

Tags: FRPएफआरपीफेअर रेम्युनरेटिव्ह प्राईसराजर्षी शाहू महाराज साखर कारखानासमरजित घाटगे
Previous Post

संवर्धनासाठी प्राधान्य प्रजाती म्हणून स्थानिक पक्षी आणि प्राण्यांवर लक्ष केंद्रित करा – केंद्रीय मंत्री भूपेंदर यादव

Next Post

“दुतोंडी राजकीय व्यवस्था व भरडलेला शेतकरी”

Next Post
“दुतोंडी राजकीय व्यवस्था व भरडलेला शेतकरी”

"दुतोंडी राजकीय व्यवस्था व भरडलेला शेतकरी"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!