Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मराठा आरक्षणासाठी विनोद पाटलांची सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
vinod patil

मुक्तपीठ टीम

मराठा आरक्षण रद्द करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात विनोद पाटील यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. इंदिरा सहानी प्रकरणाच्या निकालातून लादण्यात आलेल्या आरक्षणाच्या ५० टक्क्यांच्या मर्यादेला विनोद पाटलांच्या याचिकेतून आव्हान देण्यात आले आहे. तसेच मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाचा पुनर्विचार करावा अशी मागणी याचिकाकर्ते विनोद पाटलांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. त्यामुळे आता न्यायालय या याचिकेवर काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

 

मराठा आरक्षणाचा लढा

  • गेली अनेक दशकं मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी महाराष्ट्रात मागणी आहे. २०१६नंतर त्या मागणीने आक्रमक जोर पकडला.
  • २०१८ मध्ये तत्कालीन भाजपा सरकारने कायदा बनवून मराठा समाजाला नोकर्‍या व शिक्षणात १६% आरक्षण दिले.
  • जून २०१९ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने ते आरक्षण शिक्षणात १२% आणि नोकरीत १३% एवढे कमी केले.
  • उच्च न्यायालयाच्या निकालानुसार, अपवाद म्हणून सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली ५०% आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाऊ शकते.
  • जेव्हा हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले तेव्हा तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने इंदिरा साहनी प्रकरणाचा हवाला देऊन त्यावर स्थगिती दिली.
  • राज्य सरकारने आणि मराठा आरक्षण समर्थकांनी या प्रकरणात ५० टक्के आरक्षण मर्यादेचा घटनात्मक मुद्दा असल्याने त्याची सुनावणी मोठ्या खंडपीठापुढे व्हावी अशी मागणी केली होती.
  • आतापर्यंत झालेल्या सुनावणीत केंद्र सरकारने केलेल्या १०२व्या घटनादुरुस्तीचा मुद्दाही मांडला गेला. त्या दुरुस्तीनंतर केंद्र सरकारने आरक्षणाचे अधिकार राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला दिल्याचा दावा करुन राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारसीवर दिलेले आरक्षण घटनात्मक नसल्याचा दावा करण्यात आला.
  • मात्र, केंद्र सरकारने १०२वी घटनादुरुस्तीमुळे राज्यांचे आरक्षणविषयक अधिकार काढून घेतले नसल्याचे स्पष्ट केले.
  • इंदिरा साहनी प्रकरणात ५० टक्के आरक्षण मर्यादा सर्वोच्च न्यायालयाने सांगितली असली, तरी राज्यातील स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारला आरक्षण वाढवण्याचा अधिकार असल्याचा मुद्दा मांडला गेला.

आरक्षणावर ५० टक्के मर्यादा लादणारे इंदिरा साहनी प्रकरण काय आहे?

  • १९९१मध्ये पीव्ही नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस सरकारने आर्थिक कारणास्तव सर्वसाधारण प्रवर्गाला १०% आरक्षण देण्याचा आदेश जारी केला. त्यावर इंदिरा सावनी यांनी त्यांना आव्हान दिले.
  • या प्रकरणात, नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाने असे म्हटले होते की राखीव जागांची संख्या, जागा एकूण उपलब्ध जागांपैकी ५०% पेक्षा जास्त नसाव्यात.
  • घटनेत आर्थिक कारणास्तव आरक्षण देण्याची तरतुद नाही.
  • त्यानंतरही अनेक राज्यांनी ती मर्यादा ओलांडली आहे. राजस्थानमधील गुर्जर, हरियाणामधील जाट, महाराष्ट्रातील मराठे, गुजरातमधील पाटेल्स जेव्हा जेव्हा आरक्षणाची मागणी करतात तेव्हा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे त्याला अडथळा निर्माण होतो.

Tags: Maratha Reservationreview petitionVinod patilमराठा आरक्षणविनोद पाटीलसर्वोच्च न्यायालय
Previous Post

भारत-दुबई विमान सेवा २३ जूनपासून, प्रवासासाठी ‘हे’ आवश्यक!

Next Post

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक १३४ वर्षांचे झाले…

Next Post
CSMT

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक १३४ वर्षांचे झाले...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!