Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिक्षण संस्थांची फी मुजोरी थांबवा! विनायक मेटेंसह पालक संघटनांचं वर्षा गायकवाडांना साकडं

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
vinayak mete

मुक्तपीठ टीम

न्यायालयाने शाळेची १५ टक्के शुल्क वसुलीबाबत निर्णय घेण्याचे अधिकार शासनाला दिले आहेत. मात्र याला विरोध करत पालक संघटनांनी फक्त शिकवणी शुल्क आकारण्यात यावे, अशी मागणी केली आहे. या अनुषंगाने नवी मुंबई, मुंबई, ठाणे आणि राज्यातल्या इतर शहरातल्या पालक संघटनांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतली. यावेळी वर्षा गायकवाड यांनी पालक संघटनांच्या सर्व तक्रारी जाणून घेतल्या आणि पालकांच्या सगळ्या तक्रारी राज्य तक्रार निवारण समितीकडे सुपूर्द करण्याचे आदेश देऊन तातडीने यावर निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत.

 

नवी मुंबई पालक संघर्ष कृती समिती, मुंबई पालक समिती, पनवेल पालक संघटना, शिवसंग्राम संघटनेच्या पदाधिकारी यासह विविध पालक संघटनांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतली. आमदार विनायक मेटे हे देखील यावेळी उपस्थित होते. तसंच यावेळी विकास सोरटे, बाळासाहेब शिंदे, सत्यवान गायकवाड, प्रफुल्ल पवार, विवेक सावंत, संदीप भोईटे हे या शिष्टमंडळात सहभागी झाले होते. यानंतर शिष्टमंडळाने शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांची भेट घेवून त्यांनाही आपल्या अडचणी सांगितल्या.

 

मंत्रिमंडळाच्या बैठकीत शुल्क रचनेबाबत निर्णय घेण्याचे संकेत

  • पालकांनी फी वसुलीसाठी शिक्षण संस्था विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गातून काढत आहेत अशी तक्रार केली आहे.
  • वाढीव शुल्क वसुलीसाठी तगादा लावल्याचे पालकांनी शिक्षणमंत्र्यांना सांगितलं आहे.
  • या तक्रारींची माहिती घेऊन संबंधित शाळांची माहिती तातडीने तक्रार निवारण समितीकडे पाठवून यावर कारवाई करण्याचे निर्देश शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेत.
  • मंत्रिमंडळाच्या बैठकीत शुल्क रचनेबाबत निर्णय घेणार असल्याचेही संकेत त्यांनी दिलेत.
  • शिक्षणमंत्र्यांनी शुल्काबाबत दिलेला प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे विचाराधीन असल्याची माहिती समोर आली आहे.
  • मंत्रिमंडळ बैठकीत दोन आठवड्यांपूर्वी निर्णय घेण्यात आला होता. मात्र यावर पुन्हा होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.

Tags: BJPcabinet meetingVinayak Meteठाणेनवी मुंबईमंत्रिमंडळ बैठकमुंबईशिक्षण आमदार कपिल पाटीलशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
Previous Post

काँग्रेसचा ट्विटरवर आरोप…भाजपाच्या दबावाखाली पाच नेत्यांचे अकाऊंट लॉक!

Next Post

एअर इंडियाच्या मुख्यालयात राज्य सरकारी कार्यालयं, खरेदीसाठी महाराष्ट्र सरकारची पुन्हा बोलणी

Next Post
air india (2)

एअर इंडियाच्या मुख्यालयात राज्य सरकारी कार्यालयं, खरेदीसाठी महाराष्ट्र सरकारची पुन्हा बोलणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!