Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“भटक्या विमुक्तांच्या योजना युद्धपातळीवर राबविणार”: विजय वडेट्टीवार

September 9, 2021
in सरकारी बातम्या
0
VJNT

मुक्तपीठ टीम

राज्यातील भटक्या विमुक्त समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी महत्वूपर्ण योजना प्राधान्याने राबवाव्यात, या समाजाचे सामाजिक आर्थिक सर्वेक्षण तातडीने करावे,या समाजाच्या विकासासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना करावी अशा सूचना केंद्रिय भटक्या विमुक्त कल्याणकारी बोर्डाचे अध्यक्ष भिकु (दादा) इदाते यांनी केल्या. भटक्या विमुक्तांच्या विकासासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेत असल्याची माहिती यावेळी बहुजन कल्याण विभाग, खार जमीन विकास आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बैठकीत दिली.

 

राज्यातील भटके विमुक्तांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयातील दालनात केंद्रिय भटक्या विमुक्त कल्याणकारी बोर्डाचे अध्यक्ष दादा इदाते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला सचिव इंद्रा मालो, भटक्या विमुक्त कल्याणकारी बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी.एस.वर्मा, डॉ.मनीष गवई, राजेंद्र भोसले यासह इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

अध्यक्ष इदाते म्हणाले, राज्य शासनाकडून भटक्या विमुक्तांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांना गती देण्यात यावी. या समाजाच्या विकासासाठी केंद्र शासनाला जे प्रस्ताव पाठविले आहेत त्यांना मंजुरी देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल. भटक्या विमुक्तांसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून या समाजाच्या विकास योजनांचा आढावा व अंमलबजावणी करण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे. राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांची तपशीलवार माहिती यावेळी इदाते यांनी घेतली.

 

भटक्या विमुक्तांच्या सर्वेक्षणाच्या कामासाठी तातडीने कार्यवाही सुरू: वडेट्टीवार

बहुजन कल्याण मंत्री वडेट्टीवार म्हणाले, भटके विमुक्त जाती-जमातींच्या सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणाची कार्यवाही प्राधान्याने सुरू आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे यासाठी नोडल अधिकारी नियुक्त देखील करण्यात आला आहे. राज्य शासनाने केलेल्या कार्यवाहीची माहिती भटक्या विमुक्त कल्याणकारी बोर्डालाही सादर करण्यात येईल. या समाजाच्या विकासासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात येतील. या समाजातील लोकांना जातीचे दाखले सुलभरित्या मिळावे यासाठी यापुर्वी सामाजिक न्याय विभागाकडून काढण्यात आलेला २००८ चा शासन निर्णय ग्राह्य धरून. तलाठी, सरपंच अथवा ग्रामसेवक यांनी दिलेला रहिवास अथवा जातीसाठीचा पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यामुळे जातीचा दाखला मिळण्यातील अडसरही दूर होईल.परदेश शिष्यवृत्तीसाठी सध्या विभागाकडून दहा विद्यार्थ्यांना या विभागामार्फत पाठविले जाते आगामी कालावधीत ही संख्या पन्नासवर नेण्याचा विभागाचा मानस आहे. यामध्ये १७ विद्यार्थी वि.जा.भ.ज. व ३३ विद्यार्थी ओबीसी समाजघटकातील असतील, असेही मंत्री वडेट्टीवार म्हणाले.

 

वडेट्टीवार म्हणाले, पैठणीसाठी लागणाऱ्या कारागीर तसेच मजुरांची राज्यात मोठ्या प्रमाणात मागणी आहे हे लक्षात घेवून बंजारा समाजातील तीन हजार महिलांना पैठणीसाठी लागणाऱ्या कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे या महिलांना किमान महिन्याला पंधरा हजार रूपये घरबसल्या मिळणार आहेत. सध्या ६५० अभ्यासक्रमांचा शिष्यवृत्तीमध्ये समावेश आहे या कोर्सेसची संख्या ७०० वर नेण्यासाठी विभाग प्रयत्नशील आहे.राज्यात इतर मागास वर्ग विभागातील विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतीगृह उभारण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. केंद्र शासनाकडून यासाठी निधी मिळाल्यास या कामांना अजून गती येईल. तांडा वस्तीना लोकसंख्येच्या आधारावर निधी देखील वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्कॉलरशिप तसेच या समाजाच्या विकासासाठी प्राधान्याने योजना राबविण्यात येत असल्याचे बहुजन कल्याण मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले.

 


Tags: Dada idateMinister Vijay wadettiwarदादा इदातेबहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवारभटक्या विमुक्त समाज
Previous Post

“सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळाचे ९ ऑक्टोबर रोजी उद्‍घाटन”: सुभाष देसाई

Next Post

स्फोटकांचं प्रकरणातील एनआयएचे आरोपपत्र परमबीर सिंहांनाही भोवणार?

Next Post
NIA

स्फोटकांचं प्रकरणातील एनआयएचे आरोपपत्र परमबीर सिंहांनाही भोवणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!