Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्फोटकांचं प्रकरणातील एनआयएचे आरोपपत्र परमबीर सिंहांनाही भोवणार?

पोलीस सिक्रेट फंडातून सायबर एक्सपर्टला ५ लाख, विश्वासातील अधिकाऱ्याचा जबाब

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
NIA

मुक्तपीठ टीम

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा आरोपी म्हणून एनआयएने थेट उल्लेख केलेला नाही. त्यामुळे परमबिरांच्या आघाडी सरकारविरोधातील मदतीचा मोबदला म्हणून त्यांना आरोपी करण्याचे टाळले गेल्याचा आरोपही होत आहे. परंतु कोणत्याही कारणामुळे अंबानी स्फोटके प्रकरणाच्या आरोपपत्रात परमबिरांचा आरोपी म्हणून समावेश नसला तरी त्याच आरोपपत्रातील काही उल्लेख हे त्यांना आरोपी बनवण्यासाठी पुरेसे असल्याची चर्चा आहे. एनआयएच्याच आरोपपत्रात ते असल्याने त्याच्या सत्यतेविषयी दुमत होणार नाही. कोणी त्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयात दाद मागितली तर परमबिरांना आरोपी बनवले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

अंबानी स्फोटकांच्या प्रकरणाता वाझे, शर्मा आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांचीच नावे आरोपी म्हणून मांडण्यात आली असली तरी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणी संपलेल्या दिसत नाहीत. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) दाखल केलेल्या आरोपपत्रात सायबर एक्स्पर्टच्या धक्कादायक जबाबाची नोंद कऱण्यात आली आहे. परमबीर सिंह यांनी अॅंटेलिया प्रकरणाची दिशाभूल करण्यासाठी जैश-उल-हिंद नावाच्या दहशतवादी संघटनेशी संबंधित अहवालात छेडछाड केली असल्याचा दावा एक्स्पर्टनं केला आहे. यासाठी परमबीर सिंह यांनी सायबर एक्सपर्टला ५ लाखांची लाच दिली असल्याचा जबाब परमबीर सिंह यांच्या अत्यंत जवळच्या अधिकाऱ्याने दिला आहे. परमबीर सिंह यांच्या सांगण्यावरुन त्याने ५ लाख रुपए सिक्रेट सर्व्हिस फंडातून काढून सायबर एक्सपर्टला दिले होते, असा जबाबही त्या अधिकाऱ्याने दिला आहे.

सायबर एक्सपर्टनं काय दिला जबाब?

  • एनआयएनं सायबर एक्सपर्टचा जबाब ५ ऑगस्टला नोंदवला होता.
  • सायबर एक्सपर्टने सांगितलं की, तो अनेक आयपीएस अधिकाऱ्यांना सायबरशी संबंधित ट्रेनिंग देतो.
  • सोबतच काही इंटेलिजेंस एजन्सीसोबतही काम करतो.
  • ९ मार्च २०२१ रोजी मी मुंबई पोलिस आयुक्तांच्या कार्यालयात ट्रेनिंग संबंधी चर्चेसाठी गेलो होतो.
  • दिल्लीतल्या इस्त्रायल दुतावासासमोर झालेल्या स्फोटानंतर मी सायबर सुरक्षा तज्ज्ञ म्हणून अशाच एका टेलिग्राम चॅनलला फॉलो करत होतो.
  • यानंतर परमबीर सिंह यांनी मला विचारलं की, अशा प्रकारचा एखादा रिपोर्ट लेखी देऊ शकता का? त्यावर मी म्हटलं की हे गोपनीय आहे आणि याला दिल्ली स्पेशल सेलनं तयार केलं आहे. यासंबंधी काही लेखी रिपोर्ट मी देऊ शकत नाही असं मी त्यांना सांगितलं.
  • परमबीर यांच्या आग्रहानंतर मी माझ्या लॅपटॉपमध्ये असलेला तो अहवाल परमबीर यांना दाखवला.
  • तो अहवाल वाचल्यानंतर परमबीर यांनी मला अँटेलिया प्रकरणाची जबाबदारी घेतल्याचं जैश उल हिंदचं पोस्टर त्या पेजमध्ये अॅड करायला सांगितलं.
  • यानंतर मी माझ्या रिपोर्टमध्ये बदल केले आणि ते पोस्टर रिपोर्टमध्ये अॅड करुन परमबीर यांच्या ऑफिशियल मेलवर पाठवला.

पोलिसांच्या सिक्रेट फंडमधून सायबर एक्स्पर्टला पैसे

  • परमबीर सिंह नंतर म्हणाले की, तुम्ही खूपच भारी काम केलंय. यामुळं मी तुम्हाला पैसे देऊ इच्छितो. त्यांनी मला किती पैसे घेणार असं विचारलं.
  • त्यावर मी काही नको असं म्हटलं. मात्र, त्यांनी मला तुम्ही डिझर्व्ह करता असं म्हटलं आणि त्यांच्या पीएला बोलावून मला ३ लाख रुपये देण्याचं सांगितलं.
  • पीए तिथून जात असताना त्यांनी त्याला पुन्हा बोलावून ५ लाख रुपए देण्याची सूचना केली. त्यांनी मला पाच लाख रुपए रोख दिले.

 

कोण आहे ‘तो’ अधिकारी?

  • तो अधिकारी गेल्या १० वर्षांपासून परमबीर सिंह यांच्यासोबत काम करत आहे.
  • तो अधिकारी सध्या होम गार्ड विभागात काम करत आहे.
  • २००६ मध्ये परमबीर सिंह हे एटीएस मध्ये होते तेव्हापासून तो अधिकारी त्यांच्यासोबत आहे.
  • २००६ नंतर परमबीर सिंह ज्या ज्या पदांवर गेले त्या प्रत्येक ठिकाणी तो अधिकारी परमबीर सिंहांच्या सोबत होता.

Tags: parambir singhएनआयए सायबर एक्सपर्टपरमबीर सिंह
Previous Post

“भटक्या विमुक्तांच्या योजना युद्धपातळीवर राबविणार”: विजय वडेट्टीवार

Next Post

“ठाण्यासह कोकणातील पूरग्रस्त पत्रकारांच्या घरांसाठी उचित कार्यवाही करा!”

Next Post
raja mane

"ठाण्यासह कोकणातील पूरग्रस्त पत्रकारांच्या घरांसाठी उचित कार्यवाही करा!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!